अखेर राजन वेळूकर 'पास', कुलगुरूपदी होणार रूजू

अखेर राजन वेळूकर 'पास', कुलगुरूपदी होणार रूजू

  • Share this:

rajan welukar3405 मार्च : मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदावरून सुरू असलेल्या वादात अखेर राजन वेळूकर 'पास' झाले आहे. राजन वेळूकर यांना राज्यपाल विद्यासागर राव यांनी कुलगुरूपदी पुन्हा रुजू होण्याच्या सुचना दिल्या आहे. त्यामुळे वेळुकरांना मोठा दिलासा मिळालाय.

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू राजन वेळूकर यांच्या कुलगुरूपदावरून मोठा वादंग निर्माण झाला होता. राजकीय वशिल्यानं त्यांची नियुक्ती झाली, असा गंभीर आरोप त्यांच्यावर झाला होता. एवढंच नाहीतर वेळुकरांच्या शैक्षणिक पात्रतेविषयी शंकाही निर्माण झाल्या होत्या. तसंच कुलगुरूपदासाठी राजन वेळूकर यांनी कोणताही शोध-प्रबंध सादर केलेले नाही. कोणत्याही विषयावर त्यांनी संशोधन केलं नाही. त्यामुळे अशी व्यक्ती कुलगुरूपदावर नियमानुसार बसू शकत नाही. राजन वेळूकर यांनी निवडीच्या वेळी खोटी माहिती दिला. प्राध्यापक नसतानाही वेळूकरांची कुलगुरू म्हणून नेमणूक करण्यात आली, असे आक्षेपही घेण्यात आले होते. या सर्व आरोपांमुळे अखेर मुंबई हायकोर्टाने वेळूकर यांना अपात्र ठरवलं होतं. त्यानंतर राज्यपालांनी कुलगुरूपद सोडण्याचे आदेश दिले. त्यामुळे वेळूकर चांगलेच अडचणीत आले होते. वेळूकर यांनी हायकोर्टाच्या निर्णयाला आव्हान देत सुप्रीम कोर्टात धाव घेतली. सुप्रीम कोर्टाने तुर्तास दिलासा दिल्यामुळे राजन वेळूकर यांचा कुलगुरूपदाच्या मार्गातला अडथळा परत दूर झाला. आता राज्यपालांनीच वेळूकर यांना कुलगुरूपदी रूजू होण्याची सुचना दिलीये.

काय होते डॉ. राजन वेळूकर यांच्यावरील आक्षेप ?

- 7 जुलै 2010 ला मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ.राजन वेळूकर यांची नियुक्ती झाली

- तेव्हापासूनच त्यांच्या पात्रतेविषयीचा वाद पेटलाय

- कुलगुरुंच्या विरोधात दोन जनहित याचिका दाखल

- कुलगुरूंच्या अर्हतेवर आक्षेप घेणार्‌या याचिका

- कुलगुरुंच्या निवडीसाठीचे कायदेशीर निकष पाळले नसल्याचा आरोप

- कुलपती आणि निवड समितीची दिशाभूल केल्याचा आरोप

- निकषानुसार, कुलगुरूपदासाठीच्या व्यक्तीने पीएचडीनंतर 5 संशोधनपर पेपर नामांकित जर्नल्समध्ये प्रसिद्ध केले असले पाहिजेत आणि किमान 15 वर्षांचा शिकवण्याचा अनुभव असणं गरजेचं

- वेळूकर यांनी 25 वर्षांचा शिकवण्याचा अनुभव असल्याचा दावा केला होता

तसंच, 12 संशोधनपर पेपर प्रसिद्ध केल्याची माहिती अर्जात कुलपती-राज्यपालांकडे दिली होती

- डॉ. राजन वेळूकर यांनी त्यांच्या पीएचडीची तारीख बायो डाटामध्ये दिली नाहीये

- कोर्टात दिलेल्या प्रतिज्ञापत्रात मात्र, फक्त 5 संशोधनपर पेपर लिहिल्याची माहिती दिली. म्हणजे किमान पात्रता कुलगुरू पूर्ण करतात

- प्रत्यक्षात हे 5 ही पेपर संशोधनपर नसल्याचा याचिकाकर्त्यांचा आणि डॉ. नीरज हातेकर यांचा दावा

तसं प्रतिज्ञापत्र कोर्टात सादर केलंय

- कुलगुरूंनी कोड ऑफ कंडंक्टमधील शेवटच्या कलमाचा भंग केलाय.

- स्वत:च्या प्रमोशनसाठी खोटी आणि चुकीची माहिती दिली

- कुलपती आणि विद्यापीठाची दिशाभूल केलीय. त्यामुळे त्यांचाच राजीनामा घ्यावा, अशी वाढती मागणी

- कुलगुरूपदावरून दूर होण्याचे राज्यपालांचे आदेश

- वेळुकरांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा

- कुलगुरूपदी पुन्हा रूजू होण्याची राज्यपालांची सुचना

Follow @ibnlokmattv

First published: March 5, 2015, 11:24 PM IST

ताज्या बातम्या