काँग्रेसच्या बॅनरवरून नारायण राणे गायब

काँग्रेसच्या बॅनरवरून नारायण राणे गायब

  • Share this:

rane33305 मार्च : राज्यात काँग्रेसमधल्या फेरबदलानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे चांगलेच संतापले आहेत. पण आता त्यांना काँग्रेसनं आणखी एक धक्का दिलाय. काँग्रेसच्या बॅनर्सवरून नारायण राणेंना डावलण्यात आलंय.

मुंबई शहर काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रं संजय निरुपम यांनी आज स्वीकारली. आझाद मैदानात हा पदग्रहण समारंभ झाला. यावेळी काँग्रेसनं बॅनर आणि पोस्टर्स लावले होते.

या बॅनरमध्ये काँग्रेसच्या अनेक नेत्यांचे फोटो होते. पण नारायण राणेंना मात्र या पोस्टर्समध्ये स्थान देण्यात आलेलं नाहीय. त्यामुळे राणेंच्या विरोधातली पक्षातील अंतर्गत नाराजी जाहीरपणे समोर आलीये.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 5, 2015 08:18 PM IST

ताज्या बातम्या