जीवे मारण्याच्या धमकीनंतर अण्णांच्या सुरक्षेत वाढ

जीवे मारण्याच्या धमकीनंतर अण्णांच्या सुरक्षेत वाढ

  • Share this:

anna on kejriwal

05 मार्च : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. अण्णा हजारे यांच्या सुरक्षेसाठी आता 26 पोलीस नियुक्त करण्यात आले आहेत. तसचं अण्णांच्या ऑफिस आणि घराबाहेर मेटल डिटेक्टरही बसवण्यात आले आहेत. तसंच परिसरात तीन वेळा तपासणीही केली जाणार आहे.

याबद्दल माहिती मिळाल्यावर अण्णा हजारे यांच्या कार्यालयाने ठाणे पोलीसांकडे तक्रार दाखल केली असून, राज्याच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहून याबद्दल माहिती देण्यात आली आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्यावर झालेल्या हल्ल्यांनंतर पोलिसांनी अण्णांना या आलेल्या धमकीची गंभीर दखल घेतली आहे.

दरम्यान, अण्णा हजारे यांनी आपण अशा कोणत्याही धमकीला घाबरत नसल्याचे म्हटलं आहे. केंद्र सरकारच्या भू-संपदान विधेयकाविरोधात आपण नियोजित पदयात्रा काढणारच, याचाही त्यांनी पुनरुच्चार केला.

Follow @ibnlokmattv

First published: March 5, 2015, 10:19 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading