कोल्हापूरच्या महापौर तृप्ती माळवींच्या घरावर दगडफेक

कोल्हापूरच्या महापौर तृप्ती माळवींच्या घरावर दगडफेक

  • Share this:

128971-trupti-malavi

05 मार्च :  लाचखोरीचे आरोप असलेल्या कोल्हापूरच्या महापौर तृप्ती माळवी यांच्या घरावर काल (बुधवारी) अज्ञात हल्लेखोरांनी दगडफेक केली. रात्री अडीचच्या सुमारास ही दगडफेक करण्यात आली. दगडफेक करून घराच्या काचा फोडण्यात आल्या, तसंच दरवाजा तोडण्याचाही प्रयत्न करण्यात आला. दगडफेकीसोबत त्यांच्या घरावर पत्रंही फेकली असून त्यात लगेच राजीनामा देण्याची धकमी देण्यात आली आहे. या हल्ल्यानंतर तृप्ती माळवी यांच्या घरासमोर कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

दरम्यान, 'माझ्यावर खोटे आरोप करण्यात आले असून, माझ्या विरुद्ध षडयंत्र रचले जात आहे. त्यामुळे माझा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत मी महापौर पदाचा राजीनामा देणार नाही', अशी प्रतिक्रिया तृप्ती माळवी यांनी पक्षातून हकालपट्टी झाल्यानंतर दिली आहे. कोल्हापूरच्या महापौर तृप्ती माळवी यांच्यावर 16 हजारांची लाच घेतल्याचा आरोप आहे. याच पार्श्वभूमीवर काल (बुधवारी) राष्ट्रवादी काँग्रेसमधून त्यांची हकालपट्टी करण्यात आली असून, त्यांच्यावर महापौरपदाचा राजीनामा द्यावा यासाठी दबाव आणला जात आहे. कालच राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनीही त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यामुळे हा हल्ला राजकीय हेतूपोटी होता का? याचा तपास पोलीस करत आहेत.

Follow @ibnlokmattv

First published: March 5, 2015, 9:46 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading