राणे चीनला रवाना, निर्णय रविवारी करणार जाहीर ?

  • Share this:

56rane_pc03 मार्च : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी सध्या 'वेट अँड वॉच'ची भूमिका घेतलीये. राणे आज महत्वाची घोषणा करणा अशी शक्यता होती पण आज रात्री राणे चीनला रवाना होणार आहे. रविवारी चीनहुन परतल्यानंतर राणे आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचं कळतंय. काँग्रेसमध्ये सर्वांशी चर्चा करून निर्णय घेण्याची प्रथा नसेल तर ती पाडावी, असं पुन्हा एकदा राणेंनी म्हटलंय.

मुंबई आणि प्रदेश काँग्रेस अध्यक्ष बदलानंतर पक्षात नाराज असलेल्या नारायण राणेंनी आपली नाराजी उघड केली. त्यामुळे राणेंनी पुन्हा म्हणजेच तिसर्‍यांदा बंडाचा झेंडा फडकावलाय. आज प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि संजय निरुपम यांनी राणेंची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. पण राणेंनी काही प्रतिसाद दिला नाही.

राणेंनी आपल्या पुढच्या राजकीय भूमिकेबाबत चर्चेसाठी कोकणातील आपल्या कार्यकर्त्यांना तातडीने मुंबईला बोलवून घेतलं होतं. राणेंना पक्षात डावलण्यात येत असल्याची भावना आजही कोकणातील राणे समर्थक काँग्रेस कार्यकर्त्यांकडून ऐकायला मिळतेय. तर आपले नेते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असल्याचंही कार्यकर्ते विश्वासान सांगतायत.

त्यामुळे राणेंच्या राजकीय भूमिकेकड़े कार्यकर्त्यांसोबतच राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं होतं. मात्र, तुर्तास राणेंनी काँग्रेसच्या म्हणी प्रमाणे 'थंडा करके खाओ' असा नवा पवित्रा घेतलाय. राणे आज रात्री चीनला रवाना होणार आहे. रविवारी ते मुंबईत परणार आहे त्यानंतरच ते आपला निर्णय जाहीर करणार असल्याचं कळतंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 3, 2015 10:37 PM IST

ताज्या बातम्या