राणे नाराजीनाट्याचा मनधरणी अंक,चव्हाणांशी फोन पे चर्चा

राणे नाराजीनाट्याचा मनधरणी अंक,चव्हाणांशी फोन पे चर्चा

  • Share this:

rane on niriupam403 मार्च : काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा नारायण राणे नाराजीनाट्याच्या चौथ्या अंकाला सुरूवात झालीये. प्रदेशाध्यक्षपद आणि संजय निरुपम यांच्या निवडीवरून नारायण राणेंनी चांगलीच आदळआपट केली असून आज आपल्या नाराजीचं खापर त्यांनी संजय निरुपम यांच्यावर फोडले आहे. राणेंची मनधरणी करण्यासाठी अशोक चव्हाणांनी फोन केला. तर संजय निरुपम यांनीही फोन केला पण राणेंनी निरुपम यांना कोणताही प्रतिसाद दिला नाही. राणेंची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू असून राणेंनी अजूनही कोणतीच भूमिका स्पष्ट केली नाही.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत काँग्रेसला जनतेनं चांगलाच हात दाखवत घरचा रस्ता दाखवला. राज्यात 15 वर्षांची सत्ता उपभोगणार्‍या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जनतेनं स्पष्ट नकार दिला. काँग्रेस तिसर्‍या स्थानावर फेकली गेली. या लाजिरवाण्या पराभवामुळे काँग्रेसमध्ये स्मशान शांतता पसरली होती. पक्षातली मरगळ झटकून काढण्यासाठी काँग्रेस हायकमांडने सोमवारी पक्षात अनपेक्षित फेरबदल केले. प्रदेशाध्यक्षपदी आदर्श घोटाळ्यातील आरोप असलेले खासदार अशोक चव्हाण यांची निवड करण्यात आली.

तर उत्तरभारतीय मतदारांवर डोळ ठेवत मुंबई शहरध्यक्षपदी खासदार संजय निरुपम यांची निवड करण्यात आलीये. या दोन्ही निवडीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. आपल्याला डावलून ही निवड करण्यात आली अशी टीकाच पक्षश्रेष्ठींवर केली.

नारायण राणेंच्या नाराजीनाट्य आज दुसर्‍या दिवशीही सुरूच आहे. राणेंची मनधरणी करण्यासाठी अशोक चव्हाण आणि संजय निरुपम यांनी फोन केला. चव्हाणांनी राणेंनी बातचीत केली पण निरुपम यांना कोणताही प्रतिसाद दिला नाही. चव्हाणांनी राणेंना सहकार्य करण्याची विनंती केलीये आहे. पण तरीही राणेंची नाराजी अद्यापही दूर झाली नाहीये. विशेष म्हणजे, संजय निरुपम लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले होते. तर राणेंही विधानसभेत आपल्याच होमग्राऊडवर पराभवाला सामोरं गेले होते.

Follow @ibnlokmattv

First Published: Mar 3, 2015 02:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading