अशोक चव्हाण काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष तर संजय निरुपम मुंबई अध्यक्षपदी

अशोक चव्हाण काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष तर संजय निरुपम मुंबई अध्यक्षपदी

  • Share this:

ashok chavan and sanjay nirupam

02 मार्च :  महापालिका निवडणुकांच्या तोंडावर प्रदेश काँग्रेसच्या कार्यकारिणीमध्ये मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी खासदार अशोक चव्हाण यांची निवड झाली आहे. तर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी संजय निरुपम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांनी हा निर्णय घेतल्याचे समजते.

माणिकराव ठाकरे यांच्या जागी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार अशोक चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अशोक चव्हाण पेड न्यूज प्रकरणी अडचणीत आल्यामुळे, त्यांना प्रदेशाध्यक्षपद मिळण्याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. पण गेल्या काही दिवसांत न्यायालयाकडून चव्हाण यांना मिळालेल्या दिलासामुळे काँग्रेसने त्यांच्या गळ्यात महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची माळ टाकली. तर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी जर्नादन चांदूरकर यांना डच्चू देत त्यांच्या जागी संजय निरुपम यांची वर्णी लागली आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये निवडणुकीच्या मैदानात काँग्रेसने सपाटून मार खाल्ल्यानंतर महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षात संघटनात्मक फेरबदल करण्याची मागणी करण्यात येत होती. त्याच पार्श्वभूमीवर हे बदल करण्यात आल्याचे समजते.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 2, 2015 02:07 PM IST

ताज्या बातम्या