शिवसेनेचा भूसंपादन विधेयकाला ठाम विरोध - सुभाष देसाई

  • Share this:

subhash

01 मार्च : भूसंपादन विधेयक संसदेत आणण्यापूर्वी केंद्रीय मंत्री शिवसेनेशी बोलायला का आले नाहीत, असा सवाल करत शिवसेनेचे नेते सुभाष देसाईंनी भूसंपादन विधेयकाला आमचा अजूनही ठाम विरोध असल्याचं स्पष्ट केलं आहे.

'मोठ्याने ओरडल्याशिवाय कोणी ऐकायलाच तयार नसेल तर मोठ्याने ओरडण्या इतका शिवसेनेचा आवाज बुलंद आहे. त्यामुळे भूसंपादन विधेयकाविरोधातही हा आवाज असाच बुलंद राहील, असंही त्यांनी यावेळी म्हटलं.

दोन दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली होती. 'मातोश्री'वर झालेल्या या भेटीदरम्यान गडकरींनी भूसंपादन विधेयकाबाबत उद्धव यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला होता. या भेटीच्या पार्श्वभूमीवरच सुभाष देसाई यांनी भाजपला सुनावलं आहे.

या विधेयकाबाबत आधी चर्चा झाली असती तर शिवसेनेचा कोणत्या गोष्टींना आक्षेप आहे, हे सरकारच्या लक्षात आलं असतं. या विधेयकातून काय हटवायला हवं, याचं लेखी निवेदनच आम्ही केंद्र सरकारला देणार असून त्या बाबी या विधेयकातून हटवायलाच हव्यात, असंही सुभाष देसाई यांनी सांगितलं.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 1, 2015 04:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...