कॉ. पानसरे यांच्यावर 2 बंदुकीतून 5 गोळ्या झाडल्या!

  • Share this:

pansaren;rjwehuih

28 फेब्रुवारी :  कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावर 2 बंदुकीतून 5 गोळ्या झाडण्यात आल्याचं फॉरेन्सिक अहवालात स्पष्ट झालं आहे. कॉम्रेड पानसरे यांच्या हत्या प्रकरणात हल्लेखोरांचा माग काढण्यासाठी फॉरेन्सिक अहवालाची मोठी मदत होणार आहे.

16 फेब्रुवारी रोजी कॉ. पानसरे यांच्यावर 2 अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या घराजवळच्या 2 बंदुकीतून गोळीबार केला होता. या हल्ल्यात कॉमरेड पानसरे यांच्या पत्नी उमा पानसरेंही गंभीर जखमी झाल्या होत्या. पानसरे दाम्पत्यावर सुरूवातीला कोल्हापुरातच उपचार सुरू होते, मात्र पानसरेंच्या प्रकृती चढउतार होत असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईला आणण्यात आलं होतं. मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान, 20 फेब्रुवारी रोजी त्यांचं निधन झालं. तब्बल पाच दिवस सुरू असलेली त्यांनी मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली.

दरम्यान, सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पानसरे दाम्पत्यावर 2 बंदुकीतून 5 गोळ्या झाडण्यात आल्या. डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांच्या हत्येसाठी वापरलेली पिस्तुलं वेगवेगळी होती, असंही या फॉरेन्सिक अहवालात नमूद केलं आहे. या हत्या प्रकरणाचा तपास कोल्हापूर पोलीस, कोल्हापूर क्राईम ब्रांच आणि मुंबई एटीस अशा वेगवेगळ्या पातळीवर करत आहे. आतापर्यंत पोलिसांनी निपाणी आणि गोकाक भागात चौकशी केली असून सीमाभागातही पानसरे हत्या तपास सुरू आहे.

Follow @ibnlokmattv

First published: February 28, 2015, 1:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading