बिल्डर प्रदीप जैन हत्या प्रकरणी गँगस्टर अबू सालेमला जन्मठेप

बिल्डर प्रदीप जैन हत्या प्रकरणी गँगस्टर अबू सालेमला जन्मठेप

  • Share this:

abu sale,

25 फेब्रुवारी :  बिल्डर प्रदीप जैन हत्याप्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमला जन्मठेपेची शिक्षा मुंबईच्या विशेष टाडा कोर्टाने सुनावली आहे. त्याला 2 लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. तर कोर्टाने अबू सालेमचा ड्रायव्हर मेहंदी हसन यालाही जन्मठेप आणि 1 लाखाचा दंड ठोठावला आहे.

बिल्डर प्रदीप जैन यांची 7 मार्च 1995मध्ये जुहूतील बंगल्याबाहेर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. पोलिसांच्या माहितीनुसार जैन यांनी सालेमसाठी जागा देण्यास नकार दिल्याने त्यांची हत्या करण्यात आली होती. विशेष 'टाडा' कोर्टाने 16 फेब्रुवारीला अबू सालमेसह त्याचा ड्रायव्हर मेहंदी हसन आणि बिल्डर वीरेंद्र झांब यांना जैन यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरविले होते.

दरम्यान, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सालेमला फाशीची मागणी केली होती. मात्र, पोर्तुगाल आणि भारत सरकार यांच्यामध्ये प्रत्यार्पण नियमांमुळे ही मागणी मागे घ्यावी लागली. पण असं असलं तरी त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली पाहिजे, असा युक्तिवाद निकम यांनी केला होता.

Follow @ibnlokmattv

First published: February 25, 2015, 1:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading