'म्यॅव म्यॅव' आता पिंजर्‍यात!

  • Share this:

snorting

23 फेब्रुवारी : शाळकरी आणि कॉलेजच्या मुला-मुलींमध्ये 'म्यॅव म्यॅव' आणि 'एम-कॅट' अशा कोड भाषेत फेमस असललेल्या 'एमडी ड्रग' या अंमली पदार्थावर एमडी ड्रग्जवर एनडीपीस कायद्याअंतर्गत बंदी घालण्यात आली आहे. मुंबईतील अनेक भागात एमडी ड्रग्जची खुलेआम विक्री होत होती. एमडी ड्रग्जच्या नशेमुळे मुंबईतील अनेक तरुणांचा मृत्यू झाला तर अनेक तरुणींवर लैंगिक अत्याचार झाल्याच उघड झाल होतं. अखेर एमडी ड्रग्जचा अंमलीपदार्थविरोधी कायद्यात समावेश व्हावा यासाठी पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या प्रयत्नांना आता यश आलं आहे. तसंच, आयबीएन लोकमतनेही यासाठी नियमितपणे पाठपुरावा केला होता.

'मेफेड्रोन' असं अधिकृत नाव असलेला हा अंमली पदार्थ 150-500 रुपये प्रती ग्रॅम दराने वेबसाइटच्या माध्यमातून सहज उपलब्ध आहे. बबल्स, म्यॅव म्यॅव, एम-कॅट अशा वेगवेगळ्या कोड नावांनी एम डी ड्रग ओळखला जातो. तरुण वर्गाला व्यसनाधीन करणारा हा पदार्थ शरीरासाठी घातक आहे. परंतु, अंमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्याखालील पदार्थांच्या यादीत त्याचा समावेश होत नसल्याने संबंधितांवर कारवाई न्हवती.

जगभरातल्या तब्बल 53 देशांमध्ये या ड्रग्जवर बंदी घालण्यात आलेली आहे. पण भारतात त्यावर बंदी नसल्याने हे ड्रग्ज सर्वत्र अगदी सहज उपलब्ध आहे. विशेष म्हणजे शाळा आणि कॉलेजांबाहेर ते मोठ्या प्रमाणात विकले जातात. या गोष्टीचं गंभीर्य लक्षात घेता त्यावर तत्काळ बंदीची मागणी होत आहे. 12 फेब्रुवारीला यासबंधीचे परिपत्रक काढण्यात आलं असून एमडी ड्रग्सचा नारकोटिक्स ऍक्टमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आता एमडीची नशा करणार्‍यांबरोबरच एमडीची खुलेआमपणे विक्री करणार्‍यांना चांगलाच चाप बसणार आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 23, 2015 08:58 PM IST

ताज्या बातम्या