मुंबई विद्यापीठानेही दिला तृतीयपंथीयांना न्याय, प्रवेशअर्जात आता 'तिसरा' कॉलम

मुंबई विद्यापीठानेही दिला तृतीयपंथीयांना न्याय, प्रवेशअर्जात आता 'तिसरा' कॉलम

  • Share this:

university

23 फेब्रुवारी : तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी देश आणि राज्य पातळीवर अनेक प्रयत्न सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर येत्या शैक्षणिक वर्षात कॉलेजांच्या प्रवेश अर्जांमध्ये 'ट्रान्स जेंडरां'साठी वेगळा रकाना (कॉलम) ठेवण्याचा महत्वाचा निर्णय मुंबई विद्यापीठाने घेतला आहे.

कॉलेज प्रवेशअर्जात स्त्री, पुरूष आणि ट्रान्सजेंडर म्हणजेच तृतीयपंथीय असा तिसरा कॉलम उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तृतीयपंथीयांबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या सकारात्मक निकालाची दखल घेत युजीसीने देशभरातील विद्यापीठांना वेगळा रकाना बनवण्याचे निर्देश दिले होते. त्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठानं प्रवेश अर्जात 'ट्रान्स जेन्डर' कॉलमचा समावेश कसा करण्यात येईल, यासाठी तयारी सुरू झाली आहे. लवकरच हा प्रस्ताव विद्यापीठाच्या मॅनेजमेंट कौन्सिलच्या बैठकीत सादर करून त्याला अंतिम मान्यता देण्यात येणार आहे.


Follow @ibnlokmattv

First published: February 23, 2015, 5:19 PM IST

ताज्या बातम्या