'उद्या नक्षलचळवळ झाली तर त्याचं नेतृत्व करेन'

  • Share this:

Image udayan_raje_bhosle_sot_300x255.jpg23 फेब्रुवारी : देशात रयतेचं राज्य आहे का ? देशात सर्वसामान्यांमध्ये राज्यकर्त्यांविषयी उद्रेक आहे. या उद्रेकातून नक्षलवाद चळवळ उदयास आली तर त्याच नेतृत्व करेन असा गंभीर इशारा राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे राजे भोसले यांनी दिलाय.

या देशाला राज्यकर्त्यांनी लुटण्याचं काम केलंय. जमीन अधिग्रहण, महिलांवर होत असलेले अत्याचार, सामाजिक कार्यकर्त्यांचे होत असलेले खून, साखर कारखान्यांची लूट यासारख्या परिस्थितीतून लोक हताश आणि संतप्त झालेत. त्यातून नक्षलवाद निर्माण झाल्याशिवाय रहाणार नाही असा इशाराही उदयनराजे यांनी दिलाय.

उदयनराजेंची फटकेबाजी

जमीन अधिग्रहन अध्यादेश सहन करणार नाही, लागू करुन तर पहा

आमचं नका ऐकू पण निदान चहावाल्यांचं तर ऐका

हॉलिवूड बॉलिवूड पेक्षाही पॉलिवूड ( म्हणजे पॉलिटिशीअन) ना ऑस्कर द्या.

दाभोळकर, पानसरेंच्या हत्येचा केवळ निषेध नको ऍक्शन हवी

बलात्कारा जाहीर फाशी द्या

उद्या नक्षलचळवळ झाली तर त्याचं नेतृत्व करेन

Follow @ibnlokmattv

First published: February 23, 2015, 1:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading