News18 Lokmat

अण्णा पुन्हा जंतरमंतरवर,भूसंपादन विरोधी आंदोलनात सहभागी

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Feb 23, 2015 10:50 AM IST

46anna_on_jain23 फेब्रुवारी : पुन्हा एकदा अण्णा जंतरमंतरवर दिसणार आहे. भूसंपादन कायद्याच्या अध्यादेशाविरोधात दिल्लीत जंतरमंतरवर धरणं आंदोलन होत आहेत. या आंदोलनात ज्येष्ठ समाजसवेक अण्णा हजारे सहभागी होणार आहेत. त्यांच्यासह मेधा पाटकर, राजेंद्र सिंहही असणार आहे. या आंदोलनाला आप सरकारने पाठिंबा दिलाय.

मोदी सरकारने आणलेल्या भूसंपादन कायद्याच्या अध्यादेशाविरोधात आजपासून दिल्लीमध्ये 2 दिवसांचं धरणे आंदोलन होतंय. हा अध्यादेश शेतकरीविरोधी आणि उद्योगपतींच्या बाजूचा आहे असा आरोप होतो आहे. या आंदोलनात देशभरातील सामाजिक कार्यकर्ते आणि संस्था सहभागी होत आहेत. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, मेधा पाटकर, राजेंद्र सिंह आणि इतर अनेक जण या आंदोलनात सहभागी होणार आहेत. दरम्यान, या आंदोलनात काँग्रेसच्या सहभागाविषयी अण्णा हजारेंना विचारले असता ते ंम्हणाले की, राहुल गांधी या आंदोलनात येऊ शकतात पण त्यांना जनतेबरोबर बसावं लागेल. जंतरमंतरवर होणारं हे आंदोलन मोदी सरकार कशा प्रकारे हाताळतंय याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 23, 2015 10:50 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...