पानसरेंवरच्या हल्ल्याचा आयबीने दिला होता इशारा

पानसरेंवरच्या हल्ल्याचा आयबीने दिला होता इशारा

  • Share this:

pansare new

22 फेब्रुवारी : गोविंद पानसरे यांच्या जीवाला धोका असल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी राज्य सरकारला यापूर्वीच दिला होता अशी धक्कादायक माहिती उघड झाली आहे. राज्य सरकारला हल्ल्याचा इशारा मिळूनही पानसरेंवर हल्ला कसा झाला असा संतप्त सवाल कम्युनिस्ट नेते भालचंद्र कांगो यांनी उपस्थित केला आहे.

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेने गृहमंत्रालयाला दिली होती. पायाभूत सुविधा आणि नैसर्गिक स्त्रोताच्या रक्षणासाठी काम करणार्‍या सामाजिक कार्यकर्त्यांना धोका असल्याचा स्पष्ट इशारा गुप्तचर यंत्रणेने गृहमंत्रालयाला दिला होता. पानसरे यांना पोलीस संरक्षण द्यायला हवं, असंही गुप्तचर यंत्रणेने गृहमंत्रालयाला सांगितलं होतं. यापार्श्वभूमीवर भालचंद्र कांगो यांनी राज्य सरकारवर कडाडून टीका केली.

Follow @ibnlokmattv

First published: February 22, 2015, 2:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading