पानसरेंच्या हल्लेखोरांची माहिती देणार्‍याला पाच लाखांचे बक्षिस

पानसरेंच्या हल्लेखोरांची माहिती देणार्‍याला पाच लाखांचे बक्षिस

  • Share this:

Pansare

22 फेब्रुवारी : पानसरे दाम्पत्यावरील हल्लेखोरांबाबत माहिती देणार्‍याला कोल्हापूर पोलिसांकडून पाच लाखांचे बक्षिस देण्यात येणार असल्याचं जाहिर केलं आहे. कोल्हापूर पोलीस अधिक्षक मनोजकुमार यांनी ही घोषणा केली आहे.

कॉ. गोविंद पानसरे यांना काल (शनिवारी) उभ्या महाराष्ट्राने अखेरचा लाल सलाम दिला. मात्र, त्यांचे मारेकरी अद्याप मोकाटचं फिरत आहेत. पोलीस यंत्रणाही त्यांच्या मारेकर्‍यांचा तपास घेण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत असली तरी मारेकर्‍याची त्यांना आजून काहीही माहिती मिळालेली नाही. त्यामुळे पानसरे दाम्पत्यावरील हल्लेखोरांबाबत माहिती देणार्‍याला कोल्हापूर पोलिसांकडून पाच लाखांचे बक्षिस देण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.

विशेष म्हणजे माहिती देणार्‍याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, अशी हमी पोलिसांनी दिली आहे. माहिती देण्यासाठी 09764002274 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 22, 2015 01:09 PM IST

ताज्या बातम्या