भारताचा द. आफ्रिकेवर ऐतिहासिक विजय

भारताचा द. आफ्रिकेवर ऐतिहासिक विजय

  • Share this:

India win

22 फेब्रुवारी :  वर्ल्ड कपमध्ये 'भारत दक्षिण आफ्रिकेसोबत कधीही जिंकू शकत नाही' असं उपहासाने म्हटले जात होते. परंतु, आज रविवारीटीम इंडियाने मेलबर्नच्या मैदानात इतिहास बदलला आहे. द. आफ्रिकेवर 130 रन्सनी दणदणीत विजय मिळवून टीम इंडियाने भारताला फटाके फोडण्याचा 'मौका' मिळवून दिला आहे.

विशेष म्हणजे भारत आणि द.आफ्रिका वर्ल्डकपमध्ये यापूर्वी तीन वेळा आमने-सामने आले होते. त्यामध्ये भारताचा पराभव झाला होता. मात्र, यावेळी कॅप्टन कुल धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने द. आफ्रिकेवर ऐतिहासिक विजय मिळविला.

मेलबर्नमध्ये भारताने मॅच तर जिंकली पण त्याअगोदर टॉसही जिंकला. टॉस जिंकून भारताने पहिली बॅटिग करण्याचा निर्णय घेतला. कॅप्टन धोणीचा हा निर्णय टीमने सार्थ करून दाखवला. भारताने द.आफ्रिकेसमोर 308 रन्सचा डोंगर उभारला. तर दुसर्‍याच ओव्हरमध्येचं मोहम्मद शमीने द. आफ्रिकेला झटका दिला. डी कॉकला अवघ्या 7 रन्सवर आऊट करून पव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यानंतर हाशिम आमलाने फटकेबाजी करायला सुरुवात केली होती. मात्र, 22 रन्सवर मोहित शर्माने त्याला बाद केलं. त्यानंतर आलेला डुमिनीला रैनाने अवघ्या 6 रन्समध्ये कॅचआऊट करून माघारी पाठवलं.

द. आफ्रिकेचे सलामीचे बॅट्समन लवकर पव्हेलियनमध्ये परतल्याने कॅप्टन एबी डिविलिअर्स आणि फाफ ड्यु प्लेसिसने द. आफ्रिकेचा डाव सारवण्याचा प्रयत्न केला. दोघांनी मिळून तिसर्‍या विकेटसाठी 68 रन्सची पार्टनरशीप केली. मात्र, मोहित शर्माच्या अप्रतिम थडोवर धोनीने एबीला पव्हेलियनचा रस्ता दाखवला. डिविलियअर्सने 38 बॉल्सचा सामना करताना 3 फोर मारत 30 रन्स केले.

त्यापूर्वी पाकिस्तानच्या विरोधात रनआऊट झाल्याने शिल्लक राहिलेली शतकाची कसर शिखर धवनने आज द. आफ्रिकेच्या विरोधातील सामन्यात भरून काढली आहे. 137 रन्सवर शिखर आऊट झाला. त्यापाठोपाठ अजिंक्य राहणेनेही 40 बॉल्समध्येहॉफ सेंच्युरी पूर्ण केली. धवनने कोहलीच्या साथीने दुसर्‍या विकेटसाठी 127 रन्सची, आणि रहाणेच्या साथीने तिसर्‍या विकेटसाठी 125 रन्सचीशानदार पार्टनरशीप रचली. या तिघांच्या स्फोटक फलंदाजीच्या बळावर भारताने द. आफ्रिकेसमोर 308 रन्सचं आव्हान ठेवलं.

Follow @ibnlokmattv

First published: February 22, 2015, 5:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading