उद्याच्या 'महाराष्ट्र बंद'ला काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा

  • Share this:

Congress NCp21 फेब्रुवारी : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या निषेधार्थ कम्युनिस्ट पक्षासह सर्व डाव्या संघटनांकडून उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिलीये. पानसरे यांच्या निधनामुळे राज्यभरातील कम्युनिस्ट कार्यकर्त्यांनी संताप आणि शोक व्यक्त केलाय. आता डाव्या संघटनांनी पुकारलेला महाराष्ट्र बंद आता सर्वपक्षीय झालाय. या बंदमध्ये डावे पक्ष, रिपाइं, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, राजू शेट्टींचा स्वाभिमानी पक्ष आणि प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षही सक्रीय सहभागी होणार आहे.

काँग्रेस कार्यकर्ते सर्वत्र सहभागी होईल. पानसरेंच्या प्रकरणामध्ये राज्य सरकारची भूमिका संशयाला वाव देणारी आणि वेगळ्या विचाराला खतपाणी घालणारी आहे अशी टीका करत माणिकराव ठाकरे यांनी बंदमध्ये सहभागी होणार असल्याचं जाहीर केलं. तर दुसरीकडे उद्याच्या महाराष्ट्र बंदला राष्ट्रवादीनेही पाठिंबा दिल्याचं जाहीर केलंय. या बंदमध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सामिल होणार असून बंद यशस्वीपणे पार पाडू असं प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे स्पष्ट केलं. दरम्यान, कम्युनिस्ट पक्षांच्या कार्यकर्त्यांनी पानसरेंच्या हत्येच्या निषेधार्थ ठिकठिकाणी आंदोलन केली जात आहे. औरंगाबाद, नाशिकमध्ये कम्युनिस्ट कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शनं केलीये.

Follow @ibnlokmattv

First published: February 21, 2015, 7:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading