चळवळीतील नेत्यांना संरक्षण द्या, काँग्रेसची मागणी

चळवळीतील नेत्यांना संरक्षण द्या, काँग्रेसची मागणी

  • Share this:

manikrao on cm 4321 फेब्रुवारी : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येनंतर पुरोगामी आणि सामाजिक चळवळीतील नेत्यांना संरक्षण देण्याची मागणी काँग्रेसनं केली आहे. काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र पाठवलंय.

प्रतिगामी व सनातन विचारधारा राज्यात डोके वर काढत आहे. त्यामुळे पुरोगामी आणि सामाजिक चळवळीतील सहभागी असलेल्या सर्वच नेत्यांना पोलीस संरक्षणाची गरज आहे.

सरकारने तातडीने अशा नेत्यांच्या सुरक्षेचा आढावा घेऊन त्यांना पुरेसं संरक्षण देण्यासंदर्भात पावले उचलावी अशी विनंती ठाकरे यांनी केलीये.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 21, 2015 04:38 PM IST

ताज्या बातम्या