'बाप बापचं असतो', राष्ट्रवादीने बॅनर लावून केली भाजपवर झोंबणारी टीका

'बाप बापचं असतो', राष्ट्रवादीने बॅनर लावून केली भाजपवर झोंबणारी टीका

खरंतर कोल्हापूरमधून भाजपला मोठा धक्का बसला आहे. कारण भाजपचे प्रदेशाध्यक्ष असेल्या चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील जागा जिंकली पण स्वत:च्या जिल्ह्यात पक्षाला एकही उमेदवार निवडून आणता आला नाही.

  • Share this:

कोल्हापूर, 26 ऑक्टोबर : पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूरमध्ये युतीला फक्त एक जागा जिंकता आली. आघाडीच्या उमेदवारांनी भाजप-शिवसेनेच्या उमेदवारांचा धुव्वा उडाला आहे. तर सेनेला सहापैकी एकच जागा वाचवता आली. आघाडीच्या या दमदार विजयानंतर आता कोल्हापूरमध्ये " बाप बापचं असतो " असे पोस्टर झळकले आहेत. कोल्हापूर शहरात एसटी स्टँड परिसरात असे पोस्टर झळकवण्यात आले आहेत.

खरंतर कोल्हापूरमधून भाजपला मोठा धक्का बसला आहे. कारण भाजपचे प्रदेशाध्यक्ष असेल्या चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील जागा जिंकली पण स्वत:च्या जिल्ह्यात पक्षाला एकही उमेदवार निवडून आणता आला नाही. भाजपचे चाणक्य अशी ओळख असलेल्या आणि राज्याच्या राजकारणात वेळोवेळी आपलं वजन दाखवलेल्या चंद्रकांत पाटील यांना कोल्हापुरात मात्र पक्षाला एक जागा जिंकून देता आली नाही. त्यामुळे भाजपच्या नाकावर टिचून 'बाप बापचं असतो' असे पोस्टर कोल्हापुरात लावण्यात आले आहेत.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने ही पोस्टरबाजी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी आणि भाजपने प्रतिष्ठेच्या केलेल्या सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांनी बाजी मारली. त्यामुळे साताऱ्यातही भाजपला मोठा धक्का बसला आहे. गेल्या निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात सेनेचे सहा आणि भाजपचे दोन आमदार निवडून आले होते. तर दोन ठिकाणी राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी बाजी मारली होती. काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नव्हती. यावेळी काँग्रेसनं जोरदार मुसंडी मारत जिल्ह्यात 4 जागा जिंकल्या तर राष्ट्रवादीने दोन जागा जिंकल्या. इतर जागांवर अपक्ष 2 तर जनसुराज्य आणि शिवसेना यांना प्रत्येकी एका जागी विजय मिळवता आला.

इतर बातम्या - भावी मुख्यमंत्र्यांच्या पोस्टरनंतर आदित्य ठाकरेंसाठी शिवसेनेचा नवा फंडा!

काँग्रेसपेक्षाही NCPची ताकद मोठी, एकट्या पवारांच्या जीवावर निवडणुकीचा खेळ बदलला!

कोण्या एका निवडणुकीमुळे एखाद्या पक्षाला कमी किंवा महान समजलं जाऊ शकत नाही असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि 80 वर्षांच्या शरद पवार यांनी सिद्ध करून दाखवलं आहे. विधानसभा निवडणुकीत पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रातला आपला दबदबा पुन्हा एकदा दाखवून दिला आहे. लोकसभेनंतर विधानसभेत भाजपची इतकी हवा होती की राज्यात विरोधी पक्षनेताच मिळणार नाही असं बोललं जात होतं. पण एकट्या पवारांच्या जीवावर निकालांचं वार गरक्यान फिरलं.

राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी असलेल्या काँग्रेसची विधासभेतली अवस्था उभ्या महाराष्ट्राने पाहिली. जसा लोकांना काँग्रेसमध्ये रस राहिला नाही तसा स्वत: काँग्रेसलाही राहिला नव्हता. काँग्रेसचा अगदी थंड प्रचार महाराष्ट्रात पाहायला मिळाला. अशी स्थिती होती की सहयोगी पक्ष काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्त्वाने महाराष्ट्राच्या प्रचारात फारसा उत्साह आणि रस दाखवला नाही. त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांवर केंद्रीय एजन्सींचे छापा आणि कुटुंबात अंतर्गत लढाई ही पवारांना डोकेदुखी ठरली.

इतर बातम्या - निकालानंतर आक्रमक झालेल्या शिवसेनेला पहिला धक्का

या सगळ्या परिस्थितीतही शरद पवार एकटे उभे राहिले. अख्खं राज्य पायाला भिंगरी बांधल्यासारखं पिंजून काढलं. मराठ्यांचा वाघ म्हणून ओळखले जाणारे 80 वर्षीय शरद पवार यांनी एकट्याने प्रचार केला आणि नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट हल्ला केला. पवारांच्या पुढे येण्याचे कारण म्हणजे त्यांच्या बालेकिल्ल्यातील लोकांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास दाखवला होता.

शरद पवार यांच्या वाढत्या ताकदीचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे त्यांच्या बालेकिल्ल्यात अजित पवार यांचा 1,40,000  हून अधिक मतांनी विजय. एकट्या बारामती विधानसभा मतदारसंघातून त्यांना आतापर्यंत 80 टक्क्यांहून अधिक मते मिळाली आहेत. मागील निवडणुकीत 41 जागांवर विजय मिळविलेल्या राष्ट्रवादीने आतापर्यंत 54 जागांवर विजय मिळवला आहे.

Published by: Renuka Dhaybar
First published: October 26, 2019, 5:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading