कोल्हापुरात कडकडीत बंद, नाशिक आणि औरंगाबादेत जोरदार निदर्शनं

कोल्हापुरात कडकडीत बंद, नाशिक आणि औरंगाबादेत जोरदार निदर्शनं

  • Share this:

protest bkp21 फेब्रुवारी : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या निषेधार्थ कोल्हापुरात कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. कोल्हापुरातील सर्व शाळा, कॉलेज आणि बाजारपेठा बंद ठेवून कॉम्रेड पानसरेंना श्रद्धांजली वाहण्यात आलीये. तसंच कम्युनिस्ट पक्षासह सर्व डाव्या संघटनांकडून उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिलीये. पानसरे यांच्या निधनामुळे राज्यभरातील कम्युनिस्ट कार्यकर्त्यांनी संताप आणि शोक व्यक्त केलाय. ठिकठिकाणी आंदोलन केली जात आहे. औरंगाबाद, नाशिकमध्ये कम्युनिस्ट कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शनं केलीये.

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या निषेधार्थ औरंगाबादेत जोरदार निदर्शनं करण्यात आली. कॉ.उद्धव भवलकर यांच्या नेतृत्वाखाली पैठणगेट परिसरात निदर्शनं करण्यात आली. या प्रसंगी डाव्या आघाडीच्या सर्व संघटनांचे पदाधिकारी निदर्शनात सामिल झाले होते. यावेळी प्रतिगामी विचारांचा धिक्कार करण्यात आला. राज्य सरकारच्या विरोधातही घोषणा देण्यात आल्या. महिलांसोबतच लहान बालकांनीही निदर्शनामध्ये सहभाग घेतला. कॉ.पानसरे यांच्या हत्येचा कडक शब्दात भलवकर यांनी निषेध केला.

तर पानसरे हत्येचे नाशिकमध्ये तीव्र पडसाद उमटले. मारेकर्‍यांना अटक करा, या मागणीसाठी माकपचं आंदोलन केलंय. माकपच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शनं केली. कार्यकर्त्यांना आवारण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला.यामुळे पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. पोलिसांनी माजी उपमहापौर मनिष बस्ते, नगरसेवक तानाजी जाईभावे यांच्यासह 30 जण ताब्यात केलं असून सर्व कार्यकर्त्यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात स्थानबद्ध केलंय.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 21, 2015 12:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...