S M L

'असले हल्ले खपवून घेणार नाही, मारेकर्‍यांना अटक करू'

Sachin Salve | Updated On: Feb 21, 2015 10:26 AM IST

cm devendra fadanvis421 फेब्रुवारी : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या निधनाने एक झुंजार आणि लढवय्या नेता आपल्यातून हिरावून नेला, याचे मला अतिव दु:ख आहे. गोरगरीब आणि समाजाच्या तळागाळातील लोकांसाठी त्यांनी दिलेला लढा आणि योगदान महाराष्ट्र कायम स्मरणात ठेवेल. अशी प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टिवट्‌रवर दिलीये.

तसंच ब्रीच कँडी रूग्णालयात मी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी गेलो होतो. राज्य सरकारने त्यांना वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. महाराष्ट्रात असले प्रकार आम्ही कदापि खपवून घेणार नाही. त्यांच्या मारेकर्‍यांना तातडीने अटक करण्याचे काम राज्य सरकार करेल असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं.


Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 21, 2015 10:26 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close