कॉम्रेड पानसरेंवर हल्ल्याचा घटनाक्रम

Sachin Salve | Updated On: Feb 21, 2015 07:35 AM IST

pansare 346321 फेब्रुवारी : कॉम्रेड गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा पानसरे यांच्यावर 16 फेब्रुवारीला कोल्हापुरातल्या सागरमळा परिसरात त्यांच्या राहत्या घराजवळ त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. चार दिवस कोल्हापुरात उपचार केल्यानंतर कालच त्यांना मुंबईत हलवण्यात आलं होतं. पण, रात्री पावणे दहाच्या सुमाराला त्यांच्या फुफ्फुसात रक्तस्राव सुरू झाला. डॉक्टरांनी अनेक प्रयत्न केले. पण, त्यांच्या प्रयत्नांना यश आलं नाही. रात्री पावणे अकरा वाजता त्यांचं निधन झालं. तासाभरात पानसरे यांचं पार्थिव ब्रीच कँडीमधून जे.जे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलंय.

असा होता घटनाक्रम

- 16 फेब्रुवारीला मॉर्निंग वॉकवरून परत येताना साडे नऊच्या सुमारास हल्ला

- बाईकवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा पानसरे यांच्यावर गोळीबार केला

- पानसरे यांना तीन गोळ्या लागल्या

- एक गोळी फुफ्फुसाजवळ, दुसरी मानेला आणि तिसरी पायाला लागली

- दोघांनाही तात्काळ कोल्हापुरातल्या ऍस्टर आधार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं

- तीन शस्त्रक्रिया करून तिन्ही गोळ्या काढण्यात आल्या

- पण, पानसरेंच्या फुफ्फुसाला सूज आल्याने त्यांना कृत्रिम श्वासोच्छाव देण्यात आला

- चार दिवस कोल्हापूरमध्ये उपचार दिल्यानंतर पाचव्या दिवशी त्यांना मुंबईत हलवण्यात आलं

- एअर ऍम्ब्युलंसनं त्यांना ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं

- पाचच्या सुमाराला त्यांना ब्रीच कँडीमध्ये दाखल करण्यात आलं

- रात्री पावणे दहाच्या सुमाराला फुफ्फुसात रक्तस्राव सुरू झाला

- त्यामुळे श्वास बंद पडला.

- डॉक्टरांनी तात्काळ ऑपरेशन करून श्वसननळी बदलली.

- पण, रक्तस्रावामुळे फुफ्फुस आणि हृदय बंद पडलं

- आणि 10 वाजून 45 मिनिटांनी कॉम्रेड गोविंद पानसरे यांची प्राणज्योत मालवली

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 21, 2015 06:27 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close