चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय टीम दक्षिण अफ्रिकेला रवाना

18 सप्टेंबर चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय टीम शुक्रवारी सकाळी दक्षिण आफ्रिकेला रवाना झाली. श्रीलंकेत मिळालेल्या विजयामुळे भारतीय टीमचा विश्वास दुणावला आहे. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय टीमकडून अपेक्षा वाढल्या आहेत. या स्पर्धेत भारत ग्रुप ए मध्ये असून या ग्रुपमध्ये ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजचा या टीमचा समावेश आहे. स्पर्धेत तगडं आव्हान असलं तरी भारतीय टीम प्रत्येक आव्हानासाठी सज्ज असल्याचं भारतीय टीमचा कॅप्टन महेंद्रसिंग धोणी यानं सांगितलं आहे. त्याचबरोबर आयसीसी क्रमवारीत नंबर वन पदासाठी भारतीय टीम प्रयत्न करेल असंही धोणीनं यावेळी सांगितलं. दक्षिण आफ्रिकेत 22 सप्टेंबरपासून चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा सुरु होत आहे.

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 18, 2009 01:24 PM IST

ताज्या बातम्या