राजन वेळूकर कुलगुरूपद सोडा, राज्यपालांचे आदेश

  • Share this:

rajan welukar19 फेब्रुवारी : मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू राजन वेळूकर यांना आज जोरदार धक्का बसलाय. राजन वेळुकर यांनी कुलगुरूपदावरून दूर व्हावे असे आदेशच राज्याचे राज्यपाल विद्यासागर राव यांनी दिले आहे. त्यांच्या जागी उपकुलगुरू नरेश चंद्र यांना तात्पुरता पदभार स्वीकारावे असे आदेशही राज्यपालांनी दिले आहेत.

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू राजन वेळूकर यांची कारकीर्द सतत वादग्रस्त राहिलीय. राजकीय वशिल्यानं त्यांची नियुक्ती झाली, असा गंभीर आरोप त्यांच्यावर झालाय. एवढंच नाहीतर वेळूकरांच्या शैक्षणिक पात्रतेविषयी शंका निर्माण झाल्यात. दोन महिन्यांपूर्वीच राजन वेळूक कुलगुरूपदासाठी अपात्र आहे असा निष्कर्ष मुंबई हायकोर्टाने नमूद केला होता. मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू ए. डी. सावंत यांनी राजन वेळूकर यांच्या निवडी संबंधीत एक याचिका मुंबई हायकोर्टात दाखल केलीये. कुलगुरूपदासाठी राजन वेळूकर यांनी कोणताही शोध-प्रबंध सादर केलेले नाही. कोणत्याही विषयावर त्यांनी संशोधन केलं नाही. त्यामुळे अशी व्यक्ती कुलगुरूपदावर नियमानुसार बसू शकत नाही. राजन वेळूकर यांनी निवडीच्या वेळी खोटी माहिती दिला. प्राध्यापक नसतानाही वेळूकरांची कुलगुरू म्हणून नेमणूक करण्यात आली, असा आक्षेप या याचिकेत घेण्यात आलाय. यावर कोर्टाने राजन वेळूकर कुलगुरूपदासाठी अपात्र आहे असा निष्कर्ष काढला होता. तसंच सावंत यांनी याअगोदरही राज्यपालांकडे याबाबत पत्र लिहून तक्रार केली होती. आता राज्यपालांनी याची दखल घेऊन वेळूकर यांनी खुर्ची सोडावी असा आदेश दिलाय. त्यामुळे इतक्या दिवसांपासून कुलगुरूपदाबाबत अडून बसणारे राजन वेळूकर काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

काय आहेत डॉ. राजन वेळूकर यांच्यावरील आक्षेप ?

- 7 जुलै 2010 ला मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ.राजन वेळूकर यांची नियुक्ती झाली

- तेव्हापासूनच त्यांच्या पात्रतेविषयीचा वाद पेटलाय

- कुलगुरुंच्या विरोधात दोन जनहित याचिका दाखल

- कुलगुरूंच्या अर्हतेवर आक्षेप घेणार्‍या याचिका

- कुलगुरुंच्या निवडीसाठीचे कायदेशीर निकष पाळले नसल्याचा आरोप

- कुलपती आणि निवड समितीची दिशाभूल केल्याचा आरोप

- निकषानुसार, कुलगुरूपदासाठीच्या व्यक्तीने पीएचडीनंतर 5 संशोधनपर पेपर नामांकित जर्नल्समध्ये प्रसिद्ध केले असले पाहिजेत आणि किमान 15 वर्षांचा शिकवण्याचा अनुभव असणं गरजेचं

- वेळूकर यांनी 25 वर्षांचा शिकवण्याचा अनुभव असल्याचा दावा केला होता

 तसंच, 12 संशोधनपर पेपर प्रसिद्ध केल्याची माहिती अर्जात कुलपती-राज्यपालांकडे दिली होती

- डॉ. राजन वेळूकर यांनी त्यांच्या पीएचडीची तारीख बायो डाटामध्ये दिली नाहीये

- कोर्टात दिलेल्या प्रतिज्ञापत्रात मात्र, फक्त 5 संशोधनपर पेपर लिहिल्याची माहिती दिली. म्हणजे किमान पात्रता कुलगुरू पूर्ण करतात

- प्रत्यक्षात हे 5 ही पेपर संशोधनपर नसल्याचा याचिकाकर्त्यांचा आणि डॉ. नीरज हातेकर यांचा दावा

तसं प्रतिज्ञापत्र कोर्टात सादर केलंय

- कुलगुरूंनी कोड ऑफ कंडंक्टमधील शेवटच्या कलमाचा भंग केलाय. स्वत:च्या प्रमोशनसाठी खोटी आणि चुकीची माहिती दिली आहे. कुलपती आणि विद्यापीठाची दिशाभूल केलीय. त्यामुळे त्यांचाच राजीनामा घ्यावा, अशी वाढती मागणी

Follow @ibnlokmattv

First published: February 19, 2015, 5:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading