S M L

स्वाईन फ्लूचं थैमान सुरूच, राज्यात बळींचा आकडा 79 वर

Samruddha Bhambure | Updated On: Feb 18, 2015 05:21 PM IST

swaine flu 23

18  फेब्रुवारी :  देशभरात स्वाईन फ्लूने थैमान घातला आहे. गेल्या 2 महिन्यांत देशभरात तब्बल 624 जणांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला आहे. हे संकट दिवसेंदिवस वाढतचं चालला आहे. राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात रुग्णांची आणि बळींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आतापर्यंत सर्वाधिक 165 बळी राजस्थानात गेले आहेत तर राज्यात 79 जणांना स्वाईन फ्लूमुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, राज्यात एका दिवसात स्वाईन फ्लूने 39 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

नागपुरात स्वाईन फ्लूची लागण झालेल्या 2 जणांचा आज मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या आता 30वर गेली आहे. नागपूरच्या सरकारी मेडिकल हॉस्पिटलने पाठवलेल्या 5 संशयित रुग्णांच्या नमुन्यांपैकी 3 नमुने पॉझिटिव्ह आल्यामुळे स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या आता 136वर गेली आहे.नाशिक जिल्ह्यातही स्वाईन फ्लूचा सहावा बळी गेला आहे. जुन्या सिडकोतील जगदीश खैरनार यांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला आहे. नाशिक शहरातील हा तिसरा मृत्यू असून जिल्हा रुग्णालयात स्वाईन फ्लूच्या 5 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. नाशिक विभागात स्वाईन फ्लूची लक्षणं असणार्‍या 4280 रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. नाशिकमध्ये स्वाईन फ्लूने झालेल्या मृत्यूच्या प्रमाणावरून, प्रशासनाकडे पुरेशी यंत्रणा नसल्याचं दिसून येत आहे.

पिंपरी-चिंचवडमध्येही स्वाईन फ्लूचे थैमान अजूनही चालूच आहे. शहरात काल स्वाईन फ्लूचा पाचवा बळी गेला. यावर्षी स्वाईन फ्लूचे तब्बल 22 रुग्ण आढळले आहेत. स्वाईन फ्लूमुळे मृतांच्या संखेत वाढ होत असल्याने शहरात चिंतेचे वातावरण आहे.

दरम्यान, स्वाईन फ्लूसाठीच्या औषधांचा तुटवडा भासत असल्याचं आता काही औषध विक्रेत्यांनी सांगायला सुरुवात केली आहे. पण तरीही औषधांचा पुरेसा साठा असल्याचा दावा सरकार करत आहे. चिंताजनक परिस्थिती बघता केंद्र सरकारने अतिरिक्त तपासणी केंद्र आणि औषधांचा साठा तयार करायला सुरू केली आहे. देशभरातील 10 हजार परवानाधारक औषध विक्रेत्यांकडे सरकारने 'टॅमिफ्लू' हे औषध विक्रीसाठी उपलब्ध केलं आहे. या संदर्भातला आढावा घेण्यासाठी आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांनी एक उच्चस्तरीय बैठक घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. स्वाईन फ्लू संदर्भामध्ये जनजागृतीसाठी सरकार आता एक ऑनलाईन मोहीमही राबवणार आहे.

Loading...
Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 18, 2015 12:36 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close