आबा अनंतात विलीन, तिन्ही मुलांनी दिला अग्नी

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Feb 17, 2015 08:06 PM IST

आबा अनंतात विलीन, तिन्ही मुलांनी दिला अग्नी

r r patil last rites 17 feb (20)17 फेब्रुवारी : महाराष्ट्राचे लाडके आबा…आर.आर.पाटील यांना शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला. आबांच्या पार्थिवावर त्यांच्या जन्मभूमी अंजनीमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. आबांच्या तिन्ही मुलांनी पार्थिवाला अग्नी दिला. पोलिसांनी बंदुकीच्या फैर्‍या झाडून आबांना अखेरची सलामी दिली. ‘अमर रहे अमर रहे’ आर.आर.पाटील अमर रहे’ च्या घोषणांनी हेलिपॅड मैदान भावपूर्ण झालं. राजकीय नेते, लाखो गावकरी आणि अवघ्या महाराष्ट्राने आज या आपल्या लाडक्या आबांना साश्रू नयनाने अखेरचा निरोप दिला.

आबांना अखेरचा निरोप, आबांच्या तिन्ही मुलांनी दिला अग्नी

आबांची इच्छा होती, दहावा, तेरावा हा कार्यक्रम करू नये, त्यामुळे 19 तारखेला अस्थीविसर्जनाचा कार्यक्रम अंजनीगावात होणार

आबांनी महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात जावून त्यांनी कार्यकर्त्यांची फळी उभारली- पवार

Loading...

आबांनी सामान्य माणसांसाठी आयुष्यभर संघर्ष केला, मात्र स्वत:च्या तब्येतीकडे लक्ष दिल नाही. राज्याच्या उभारणीत आबांचा मोठा वाटा- पवार

महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं विनम्र श्रध्दांजली अर्पण करतो- मुख्यमंत्री

शेवटपर्यंत आबा जनसामान्यांचा माणूस -मुख्यमंत्री

शोषितांचा नेता, आपल्यातून निघून गेलाय -मुख्यमंत्री

अशा या नेत्यांची पोकळी कधीच भरुन निघणार नाही -मुख्यमंत्री

दिशादर्शक व्यक्तीमत्व आबांच होतं -मुख्यमंत्री

[wzslider autoplay="true"]

अंत्यसंस्कारांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अंजनीत पोहोचले

आबांच्या पार्थिवावर अंत्यसंस्काराला सुरुवात

आबांना अखेरचा निरोप देण्यासाठी

शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, पतंगराव कदम, बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, हसन मुश्रीफ, संजयकाका पाटील, नारायण राणे, पृथ्वीराज चव्हाण, चंद्रकांत पाटील, माणिकराव ठाकरे, भास्कर जाधव, पद्मसिंह पाटील,अण्णा हजारे

सदाभाऊ खोत, मधुकर पिचड, मधुकराव चव्हाण ही उपस्थित

लाडक्या आबांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी अंजनीत अलोट गर्दी

 

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 17, 2015 01:14 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...