पानसरे यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी पाच जण ताब्यात

पानसरे यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी पाच जण ताब्यात

  • Share this:

pansare 346316 फेब्रुवारी : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पाच जणांना ताब्यात घेण्यात आलंय. कोल्हापूर पोलिसांनी ही कारवाई केलीये. या पाचही जणांची कसून चौकशी करण्यात येत आहेत. पण अजूनही काहीच धागेदोरे हाती आलेले नाहीत, असंही पोलिसांनी स्पष्ट केलंय.

आज सकाळी मॉर्निंग वॉकवरून परतत असताना ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा पानसरे यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. गोविंद पानसरे यांना एकूण तीन गोळ्या लागल्यात. त्यांच्यावर तीन शस्त्रक्रिया झाल्यात. त्यांची प्रकृती गंभीर पण स्थिर आहे. उमा पानसरे यांचीही प्रकृती स्थिर आहे. या लढवय्या नेत्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा सर्वच स्तरांतून निषेध केला जातोय. दरम्यान, उद्या सकाळी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर कम्युनिस्ट कार्यकर्ते निषेध मोर्चा काढणार आहेत.

Follow @ibnlokmattv

First published: February 16, 2015, 10:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading