आर.आर.पाटील यांची राजकीय कारकीर्द

आर.आर.पाटील यांची राजकीय कारकीर्द

  • Share this:

r r patil 16 feb16 फेब्रुवारी : हजरजबाबी, उत्कृष्ट वक्ता आणि संसदपटू आबा...अर्थात आर.आर.पाटील आणि महाराष्ट्राचे लाडके आबा... आज आपल्यात नाहीये. आबांनी चटका लावणारी एक्झिट घेतल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झालीये. आबांच्या निधनामुळे महाराष्ट्र स्तब्ध झाला. डान्सबार बंदीचा निर्णय असो अथवा गडचिरोली सारख्या नक्षलग्रस्त भागाचं पालकतत्व असो अशी अनेक धाडसी भूमिका आबांनी पार पडली.

आर.आर.पाटील यांची राजकीय कारकीर्द

पूर्ण नाव- रावसाहेब रामराव पाटील

जन्म - 16 ऑगस्ट 1957

मूळगाव - अंजनी, ता. तासगाव, जि. सांगली

1979 - सर्वप्रथम जि.प. सदस्य म्हणून निवड

1990 - तासगावचे आमदार म्हणून निवड

1990, 1995, 1999, 2004, 2009, 2014 असे सलग 6 वेळा तासगावचे आमदार

1996 - काँग्रेसचे विधानसभा प्रतोद म्हणून नियुक्ती

1998 - विधानसभा लोकलेखा समितीचे अध्यक्ष

1999 - ग्रामविकास मंत्री

2004 - गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री

2008 - मुंबई हल्ल्यावेळी वादग्रस्त विधानामुळे मंत्रिपद गमावलं

2009 - दुसर्‍यांदा गृहमंत्रिपदी नियुक्ती

2004, 2009 - राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्षपद सांभाळलं

धडाकेबाज निर्णय

- संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान यशस्वीपणे राबवलं

- महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान राबवलं

- डान्सबार बंदीचा धाडसी निर्णय घेतला आणि अंमलबजावणी केली

- डान्सबार बंदीच्या निर्णयावर टीका होऊनही आबा ठाम राहिले

- नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारलं

- आदिवासींच्या मुलांना दत्तक घेऊन मुख्य प्रवाहात आणलं

- गडचिरोलीच्या विकासकामांना चालना दिली

आबांचं वेगळेपण

- राजकीय पार्श्वभूमी नसूनही उपमुख्यमंत्रिपदापर्यंत मजल

- पश्चिम महाराष्ट्रातले नेते असूनही एकही सहकारी संस्था नावावर नाही

- एक संवेदनशील राजकीय नेता अशी ओळख

- शरद पवारांचा विश्वासू पाठीराखे

- जि.प. सदस्य ते उपमुख्यमंत्री असा खडतर प्रवास

- राष्ट्रवादीचा स्वच्छ, सोज्ज्वळ चेहरा

- मोठ्या राजकीय कारकिर्दीत भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही

- उत्कृष्ट वक्ता आणि संसदपटू

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 16, 2015 05:39 PM IST

ताज्या बातम्या