पानसरेंची प्रकृती गंभीर पण स्थिर -डॉक्टर

पानसरेंची प्रकृती गंभीर पण स्थिर -डॉक्टर

  • Share this:

pansare_kolhapur_medical16 फेब्रुवारी : कॉम्रेड गोविंद पानसरे यांची प्रकृती गंभीर असली, तरी स्थिर आहे आणि ते उपचारांना प्रतिसाद देत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. त्यांच्यावरील एक शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून दुसरी शस्त्रक्रिया सुरू असल्याची माहिती ऍस्टर आधार हॉस्पिटलचे डॉक्टर उल्हास दामले यांनी दिली आहे. दरम्यान, तिसरं बुलेटीन 7.30 वाजता होणार असल्याचंही डॉक्टरांनी यावेळी सांगितलं आहे.

कॉ. गोविंद पानसरे यांच्यासह त्यांच्या पत्नी उमा पानसरे यांच्यावर आज (सोमवारी) सकाळी गोळाबार झाला. त्यात त्यांना दोन गोळ्या लागल्या होत्या. त्यातील एक त्यांच्या एक मानेजवळ लागली तर दुसरी गोळी पोटात लागली. यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. शिवाय त्यांच्या डोक्याला जखम होऊन त्यातूनही मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला आहे. डॉक्टरांच्या उपचारांनंतर त्यांच्या मानेतून होणारा रक्तस्राव थांबल्याचे यावेळी डॉक्टरांनी सांगितलं. मात्र, पानसरे यांच्यावर अजून एक शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. पानसरे यांच्या पत्नी उमा पानसरे यांनाही एक गोळी चाटून गेली मात्र त्यांची प्रकृती स्थिर असून ते उपचारांना योग्य तो प्रतिसाद देत आहेत. मीडियांनी आणि कार्यकर्त्यांनी धीर धरावा आणि संपूर्ण सहकार्य करावं अशी विनंतीही डॉक्टारांनी केली.

Follow @ibnlokmattv

First published: February 16, 2015, 4:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading