ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते गोविंद पानसरेंसह पत्नीवर गोळीबार

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Feb 17, 2015 12:07 AM IST

ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते गोविंद पानसरेंसह पत्नीवर गोळीबार

Pansare

16 फेब्रुवारी :कामगारांच्या हक्कांसाठी आयुष्यभर लढा देणारे ज्येष्ठ विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यासह त्यांच्या पत्नीवर गोळीबार झाला आहे. या गोळीबारात गोविंद पानसरे यांच्यासह त्यांच्या पत्नीही गंभीर जखमी झाल्या आहेत. दोघांनाही जवळच्या ऍस्टर आधार नावाच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

कोल्हापुरातील सागरमळा परिसरात त्यांच्या राहत्या घराजवळ हा हल्ला झाला. ते दहाच्या सुमारास घरातून बाहेर पडताना हा हल्ला झाला. दोन अज्ञात व्यक्तींनी गाडीवरून येऊन त्यांच्यावर 3 गोळ्या झाडल्या. गोळी लागल्याने पानसरे पती-पत्नी गंभीर जखमी झाले आहेत. कोल्हापुरातील ऍस्टर आधार रूग्णालयात गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा पानसरे यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, या घटनेनंतर कोल्हापूरमध्ये नाकाबंदी करण्यात आली असून, पोलीसांनी हल्लेखोरांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी कोल्हापूर पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधला असून, त्यांना तातडीने हल्लेखोरांचा शोध घेण्याची सूचना केली आहे.

अंधश्रद्धेविरुद्ध आवाज उठवणार्‍या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावरही पुण्यात असाच हल्ला झाला होता. त्यांचे मारेकरी अद्याप मोकाट असताना आता पुरोगामी म्हणवणार्‍या महाराष्ट्रात पुन्हा अशीच लाजिरवाणी घटना घडली आहे. या हल्ल्याचा आता सर्व स्तरातून निषेध व्यक्त होतं आहे.

Loading...

कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा अल्पपरिचय

- ज्येष्ठ विचारवंत आणि कामगार नेते

- 1952पासून कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य

- 40 वर्षांपासून सामाजिक चळवळीत सक्रिय

- कोल्हापूर ही पानसरेंची कर्मभूमी

- कामगारांसाठी अनेक लढे उभारले

- घर कामगार महिलांसाठी लढा उभारला

- कोल्हापूर टोल आंदोलनातही अग्रभागी

- सामाजिक चळवळींमध्ये नेहमीच अग्रेसर

- पुरोगामी चळवळ वाढवण्यात मोठा हातभार

- अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीत सहभाग

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 16, 2015 06:57 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...