ट्राय सीरिजमध्ये भारताचा लाजिरवाणा पराभव

14 सप्टेंबरकॉम्पॅक कप ट्राय सीरिजच्या दुसर्‍या वन डेत यजमान श्रीलंकेनं भारताचा 139 रन्सनं दणदणीत पराभव केला आहे. श्रीलंकेतला भारताचा हा सर्वात मोठा पराभव ठरला. श्रीलंकेच्या अँजेलो मॅथ्यूजच्या भेदक बॉलिंगसमोर भारताच्या जवळपास सर्वच बॅटसमननं अक्षरश: लोटांगण घातलं. सचिन तेंडुलकर आणि दिनेश कार्तिकनं भारताला चांगली सुरुवात करुन दिली. या जोडीनं पहिल्या विकेटसाठी 32 रन्स केले. पण, कार्तिक 14 तर तेंडुलकर 27 रन्स करुन आऊट झाले. त्यानंतर भारताच्या पडझडीला सुरुवात झाली. मॅथ्यूजनं एकामागोमाग एक भारतीय बॅटसमनना पॅव्हेलिअनचा रस्ता दाखवला. राहुल द्रविडने एकाकी लढत देण्याचा प्रयत्न केला. पण तोही 47 रन्सवर आऊट झाला. कॅप्टन महेद्रसिंग धोणीही फार काळ मैदानावर टिकू शकला नाही. धोणीने 8 रन्स केले. तर सुरेश रैना भोपळाही फोडू शकला नाही. युसुफ पठाणही 1 रन्स करुन तर हरभजन 4 रन्स करुन पॅव्हेलिअनमध्ये परतला. श्रीलंकेच्या अँजेलो मॅथ्यूजनं 6 विकेट घेतल्या. त्याआधी पहिली बॅटिंग करणार्‍या श्रीलंकेनं 6 विकेटच्या मोबदल्यातं 307 रन्स केले. जयसुर्यानं 98 तर कदमबीनं नॉटआऊट 91 रन्स केले.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Sep 14, 2009 01:08 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 14, 2009 01:08 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...