मुख्यमंत्र्यांविरोधात खडसेंचं 'एकला चलो रे', दानवेंनी दिली ताकीद ?

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Feb 12, 2015 07:26 PM IST

मुख्यमंत्र्यांविरोधात खडसेंचं 'एकला चलो रे', दानवेंनी दिली ताकीद ?

cm vs khadse_and_danve11 फेब्रुवारी : भाजप आणि शिवसेनेमध्ये धुसफूस चव्हाट्यावर आल्यानंतर आता भाजपमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यातला वाद पुन्हा एकदा पत्र रुपाने उफाळून आलाय. आपल्या खात्याच्या अखत्यारीतील नेमणुका संदर्भात खडसे मुख्यमंत्र्यांना दाद देत नसल्याने आता चक्क प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंना यांसदर्भात पत्रवजा आदेश काढावे लागले आहेत.

एकनाथ खडसे यांनी आपल्या मर्जीतल्या मोहंम्मद हुसेन खान यांची राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली. मोहंम्मद हुसेन खान हे खडसेंच्या मुक्ताईनगर मतदार संघातील रहिवाशी आहेत. त्यांची नियुक्ती 15 जानेवारीला करण्यात आली. खरंतर कुठल्याही आयोगाच्या अध्यक्षपद नेमायचं असेल तर मुख्यमंत्र्यांची परवानगी घेणं आवश्यक आहे. पण तरीही खडसेंनी ही नियुक्ती परस्पर केलीये. ही बाब समोर येताच. पक्षाने त्याची गंभीर दखल घेतलीय. जेष्ठ मंत्री मुख्यमंत्र्यांना दाद देत नाहीत, असं स्पष्ट होताच. पक्षाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी 28 जानेवारीला एक पत्र लिहून सर्व मंत्र्यांना परस्पर नेमणुका न करण्याची सक्त ताकीद दिलीये.

काय सांगण्यात आलंय या पत्रात...

मा. मंत्री महोदय,

सप्रेम नमस्कार...

Loading...

भारतीय जनता पार्टीचे नेते व कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळे राज्यात सत्तेवर आलेल्या सरकारकडून जनतेच्या तसेच संघटनेच्या प्रचंड अपेक्षा आहेत. आपल्या खात्याअंतर्गत येणार्‍या सर्व समित्या व महामंडळाची यादी प्रदेश कार्यालयात कळवावी. या संदर्भातील कोणतीही नेमणूक परस्पर करू नये. डी. पी. डी. सी. व जिल्हा - तालुका पातळीवरील समित्यांनाही हा निकष लागू राहील.

धन्यवाद.

रावसाहेब दानवे

प्रदेशाध्यक्ष, भाजप

दरम्यान, राज्य सरकारमध्ये समन्वय राहिलेला नाही हे यावरुन दिसतंय, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी केलीय. आपल्या मंत्र्यांना समज देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना प्रशासकीय अधिकारापेक्षा पक्षाचा आधार घ्यावा लागतो. यावरून मुख्यमंत्र्यांची आपल्या मंत्रिमंडळावर किती वचक राहिलाय हे या पत्रावरून दिसतंय. अशी बोचरी टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलीये.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 12, 2015 07:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...