शिक्षकी पेशालाच काळिमा, डहाणूत प्राध्यापकाकडून विद्यार्थिनींचा विनयभंग

शिक्षकी पेशालाच काळिमा, डहाणूत प्राध्यापकाकडून विद्यार्थिनींचा विनयभंग

  • Share this:

molestation

12 फेब्रुवारी : डहाणूमध्ये शिक्षकी पेशालाच काळिमा फासणारी घटना घडली आहे. एसआरके वडकून कॉलेजमध्ये एका प्राध्यापकानेच विद्यार्थिनींचा विनयभंग केला आहे. मधुकर झांबरे असं त्या प्राध्यापकाचे नाव आहे. पीडित विद्यार्थिनीला कॉलेजच्या स्टाफ रूममध्ये बोलवून तिच्याशी अश्लील वर्तन केल्याची तक्रार विद्यार्थिनीनं डहाणू पोलिसांकडे केली आहे. तर अशाप्रकारची तक्रार का केली असा सवाल करत कॉलेज प्रशासनाकडून या विद्यार्थिनींवर दबाव टाकण्यात येतोय. त्यामुळे या विद्यार्थिनी घाबरल्या आहेत.

या शिक्षकाविरोधात पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या प्राध्यापकाचे डहाणूमध्ये खाजगी क्लासेस आहेत, कॉलेजमधल्या मुलांनी तिथे क्लास लावला नाही तर नापास करण्याची धमकीही तो द्यायचा. विशेष म्हणजे या क्लासेसची फी अव्वाच्यासव्वा असायची. तिथेही तो मुलींसोबत अश्लील चाळे केल्याच्या घटना घडल्या आहेत. याप्रकरणी पीडित विद्यार्थिनींनी कॉलेजच्या प्रशासनाकडे लेखी तक्रारही केली. मात्र कॉलेज प्रशासनाने ही बाब कॉलेजच्या प्रतिमेला घातक असल्याचं असल्याचं सांगत प्राध्यापक झांबरेवर चार दिवस उलटून गेल्यानंतरही कुठलीही कारवाई केली नाही. शेवटी पीडित विद्यार्थिनींनी डहाणू पोलिसांमध्ये तक्रार केली.

डहाणू पोलिसांनी झांबरेंविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या झांबरे फरार आहे. पण या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करण्यात येईल असं आश्वासन प्राचार्यांनी दिलं आहे. असे प्रकार या प्राध्यापकाकडून वारंवार घडत असल्याच्या तक्रारींना कॉलेजच्या इतर प्राध्यापकांनीही दुजोरा दिला आहे. 1997 पासून अशाप्रकारे मुलींची छेड काढत असल्याचं पीडित मुलींनी आयबीएन लोकमतशी बोलताना सांगितलं.

Follow @ibnlokmattv

First published: February 12, 2015, 9:14 AM IST

ताज्या बातम्या