दिल्लीतल्या भाजपच्या पराभवावर राज ठाकरेंचं व्यंगचित्र

दिल्लीतल्या भाजपच्या पराभवावर राज ठाकरेंचं व्यंगचित्र

  • Share this:

raj cartoon

12 फेब्रुवारी : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिल्ली निवडणूक आणि आपचा ऐतिहासिक विजय यावर व्यंगचित्र रेखाटले आहे. हे व्यंगचित्र मनसे अधिकृतने ट्विट केलं आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा विजय मिळाला होता. पण यंदाच्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत 'आप'कडून भाजपचा दारुण पराभव झाला आहे. या पराभवाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. त्यावर मनसे अध्यक्ष आणि व्यंगचित्रकार राज ठाकरे यांनी व्यंगचित्र काढून भाजपला चिमटा काढला आहे. राज सध्या फारच क्वचितच व्यंगचित्र काढतात पण हा निकालच एवढा ऐतिहासिक होता की त्यांनी हे व्यंगचित्र काढून त्यावर भाष्य केलं आहे.

राज यांनी व्यंगचित्रात मोदी आणि शहा भाजपच्या ट्विन्स टॉवरसारख्या मोठ्या इमारती दाखवल्या असून केजरीवालांच्या विमानाने दोन्ही इमारतींना भगदाड पाडल्याचं व्यंगचित्र रेखाटले आहे. तर दिल्लीतील हे सगळे दृश्य ओबामा टीव्ही बघत आहेत. ओबामांचा वापर करून दिल्ली निवडणुकांत मोदींनी मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला पण तरीही त्यांचा दारूण पराभव असं या व्यंगचित्रात साकारला आहे.

Follow @ibnlokmattv

First published: February 12, 2015, 10:01 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading