'...तर तो उद्धव ठाकरेंचा पराभव मानायचा का?'

'...तर तो उद्धव ठाकरेंचा पराभव मानायचा का?'

  • Share this:

uddhavfadnavis-ss-11-10-14

11 जानेवारी :  दिल्ली विधानसभेत भाजपचा दारुण पराभव झाला. त्यावर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरेंनी, लाटेपेक्षा त्सुनामी मोठी असते, अशी टीका केली होती. या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना उत्तर दिलं आहे. जर नगरपालिकेत एखाद्याचा पराभव झाला तर तो उद्धव ठाकरेंचा पराभव मानायचा का? असा प्रश्न त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारला आहे. दिल्लीत भाजपच्या पराभव म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हार असं म्हणता येणार नाही आणि दुसर्‍याच्या घरात पोरग झालं म्हणून त्याचा जास्त दिवस आनंदही साजरा करता येत नाही, असंही ते म्हणाले. दिल्लीच्या पराभवावर आत्मचिंतन करू असंही त्यांनी म्हटलं आहे.

राज्यमंत्र्यांना किती अधिकार द्यायचे, याचा निर्णय कॅबिनेट मंत्री घेत असतात. शिवसेनेचे मंत्री आपल्याला अधिकार देत नाहीत, असं मत भाजपच्या राज्यमंत्र्यांनीही मांडलं आहे, याची आठवण त्यांनी करून दिली. शिवसेनेचे राज्यमंत्री संजय राठोड यांनी केलेले आरोप त्यांनी फेटाळून लावले. महसूलमंत्री एकनाथ खडसे आपल्याला काहीच अधिकार देत नाहीत, असा आरोप करत संजय राठोड यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली होती. त्यावर, भाजपचे मंत्री आहेत तिथे शिवसेनेचे राज्यमंत्री आहेत. तसचं जिथे शिवसेनेचे मंत्री आहेत, तिथे भाजपचे राज्यमंत्री आहेत, असं ते म्हणाले. राज्यमंत्र्यांना अधिकारांचं वाटप मंत्री करतात. मंत्रिमंडळात अधिकार मंत्र्यांना असतात. त्यापैकी किती अधिकार राज्यमंत्र्यांना द्यायचे हे तेच ठरवतात. माझ्या माहितीप्रमाणे राज्यमंत्र्यांना अधिकार मिळालेले आहेत. भाजपचे राज्यमंत्रीही आपल्याला शिवसेनेच्या मंत्र्यांकडून काहीच अधिकार दिले जात नसल्याचे सांगतात, हेही देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केलं.

Follow @ibnlokmattv

First published: February 11, 2015, 2:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading