आता 'आप'चं लक्ष्य मुंबई महापालिका

आता 'आप'चं लक्ष्य मुंबई महापालिका

  • Share this:

BMC kejriwal

11 फेब्रुवारी : दिल्लीत विधानसभा निवडणुकीत विक्रमी यश मिळवलेल्या अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने आता मुंबईच्या दिशेने आपला मोर्चा वळवला आहे. 'आप' मुंबई महापालिकेची निवडणूक लढवणार असल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे दोन वर्षानंतर होणार्‍या महापालिका निवडणुकीच्या मैदानात शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि अन्य पक्षांसमोर 'आम आदमी'चं मोठं आव्हान असणार आहे.

आम आदमी पार्टीच्या दिल्लीतील अभूतपूर्व विजयाचे पडसाद आता जागोजागी उमटू लागले आहेत. महापालिका निवडणुकीपर्यंत सामान्य जनतेवर 'आप'चा प्रभाव असाचं टिकवण्याचे आव्हान मुंबईतील आम आदमी पार्टीच्या नेत्यांसमोर आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीनंतर मुंबईत राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं अस्तित्व केवळ नावापुरतेच आहे. त्यामुळे महापालिका निवडणुका सोप्या झाल्याची सेना-भाजपची समजूत होती. मात्र दिल्लीत नव्या दमाने मुसंडी मारणार्‍या आम आदमी पार्टीला मुंबईत कमी लेखण्याची चूक राज्यातील अन्य पक्ष करणार नाही, हे ही तितकचं खरं.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 11, 2015 01:09 PM IST

ताज्या बातम्या