News18 Lokmat

सेनेचे मंत्री संजय राठोड राजीनाम्याच्या तयारीत !

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Feb 10, 2015 10:49 PM IST

सेनेचे मंत्री संजय राठोड राजीनाम्याच्या तयारीत !

sanjay rathod10 फेब्रुवारी : एकीकडे 'आप'च्या 'त्सुनामी'वरून भाजप आणि शिवसेनेमध्ये जुंपलीये. आता यात आणखी भर पडली असून शिवसेनेचे नेते आणि महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांची राजीनामा देण्याची तयारीत आहे. काम करण्याची संधी मिळत नाही, नुसती लाल दिव्याची गाडी दिली, महसूल राज्यमंत्री असूनही मदत आणि पुनर्वसन खातं दिलेलं नाही अशी खंत व्यक्त करत राठोड यांनी राजीनाम्याचा निर्णय शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कानावर घातला आहे.

'सत्तेत सहभागी झालो म्हणजे शेपूट घातलं नाही' असा खणखणीत इशारा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला अलीकडेच दिला होता. त्याचे पडसाद आता उमटू लागले आहे. आज दिल्लीत आम आदमीच्या विजयावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेतली धुसफूस चव्हाट्यावर आली. आता तर सेनेचे महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी राजीनामास्त्र उपसले आहे. राठोड महसूल राज्यमंत्री असून काहीच काम करण्याची संधी मिळत नाही. नुसती लाल दिव्याची गाडी दिली पण अधिकार नाही महसूल राज्यमंत्री असूनही मदत आणि पुनर्वसन खातं दिलेलं नाही. मग सामान्य शेतकर्‍यांना, माणसाला न्याय कसा देवू अशी व्यथा राठोड यांनी उद्धव ठाकरेंकडे मांडली. मात्र, उद्धव यांनी यावर अजून कोणताही निर्ण घेतला नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात हे पाहण्याचं ठरणार आहे.

कोण आहे संजय राठोड

- शिवसेनेचे विदर्भातील आमदार

- यवतमाळ जिल्हातील दिग्रस मतदारसंघाचे तिसर्‍यांदा आमदार

Loading...

- पहिल्यांदा माणिकराव ठाकरे यांना पराभूत करुण ठरले होते जायंट किलर

- युवा नेते आणि शेतकर्‍यांसाठी अनेक आंदोलन केलेत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 10, 2015 10:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...