पोलीस हवालदारानेच केला आपल्या सहकारी महिलेचा विनयभंग

  • Share this:

mhapoliceनवी मुंबई (09 फेब्रुवारी) : देशभरात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय पण नवी मुंबईत रक्षकच भक्षकाच्या भूमिकेत आढळल्यामुळे खळबळ उडालीये. एका पोलीस हवालदारानेच एका महिला पोलीस कर्मचार्‍याचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडलीये. या प्रकारामुळे पीडित महिलेनं आत्महत्येचा प्रयत्न केलाय. कळवा पोलीस स्टेशनमध्ये यासंदर्भात गुन्हा दाखल झालाय. पीडित महिलेला कळव्यातल्या प्रकृती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय.

ठाण्यातील खारेगाव परिसरात राहणार्‍या एका पोलीस कर्मचार्‍याची व्यथा तिने आपल्या मोबाईलमध्ये नोंद ठेवली आणि आपले आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केलाय. पोलीस अधिकारी पती असलेल्या या महिला पोलीस कर्मचार्‍याने झोपेच्या गोळ्या घेवून आत्महत्येचा प्रयत्न केलाय. या महिलेची प्रकृती गंभीर असल्यामुळे कळव्यातील प्रकृती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मागील दीड महिन्यापासून बदनामीच्या भीतीने या महिला कर्मचार्‍याने आपली व्यथा कोणालाही सांगितली नाही. मात्र, आरोपी विजय पाटील या पोलीस हवालदाराच्या जाचाला कंटाळून आणि कल्पना बने या विधी अधिकार्‍यांकडून झालेल्या बदनामीला कंटाळून पीडिताने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. आता या प्रकारानंतर कळवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र अजूनही आरोपी पोलीस कर्मचारी मोकाटच आहेत.  तर पीडितेच्या पतीने पोलीस असूनही पोलिसांकडून मिळणार्‍या वागणुकीचा निषेध केलाय.

Follow @ibnlokmattv

First published: February 9, 2015, 5:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading