मराठा आरक्षण लागू नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Feb 9, 2015 04:53 PM IST

मराठा आरक्षण लागू नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द

maratha_reserपुणे (09 फेब्रुवारी) : मराठा आरक्षणाला कोर्टाने स्थगिती दिल्यामुळे आता ज्या महाविद्यालयात मराठा आरक्षणानुसार विद्यार्थ्यांना शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशही देण्यात आले ते आता रद्द करण्यात येत आहेत. पिंपरी चिंचवड मधल्या इंजिनिअरींग कॉलेजमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांचे प्रवेश याच कारणांमुळे रद्द करण्यात आले आहेत.

ऑगस्ट 2014 मध्ये शिक्षण क्षेत्रात मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण जाहीर करण्यात आलं होतं, त्यासाठी सरकारने काढलेल्या अद्यादेशानुसार एका महिन्याची मुदत देऊन, वैध जातप्रमाणपत्र दाखल करण्याचे मुभा देण्यात आली होती. त्यानुसार महाविद्यायालयांनी विद्यार्थ्यांचे प्रवेश करून घेतले होते, मात्र मधल्या काळातील लोकसभा आणि विधासनभेच्या निवडणूक आचारसंहितेमुळे मराठा आरक्षणाच्या मुद्याची पूर्तता सरकार करू शकलं नाही आणि त्याच दरम्यान, हायकोर्टाने मराठा आरक्षण रद्द केलंय. त्यामुळे पिंपरी चिंचवड मधल्या इंजिनिअरींग कॉलेजमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांचे प्रवेश याच कारणांमुळे रद्द करण्यात आले आहेत. यासंदर्भातली माहिती त्यांना एका लेखी पत्राद्वारे कळविण्यात आलीये. तंत्र शिक्षण विभागाच्या संचालकांनी दिलेल्या आदेशानुसार हे प्रवेश रद्द केले जात असल्याचं कॉलेजचं म्हणणं आहे. तर या आदेशामुळं पालकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. या विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाण्याचीही शक्यता आहे.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 9, 2015 04:53 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...