लाचखोर महापौर तृप्ती माळवी राजीनामा देण्याची शक्यता

  • Share this:

128971-trupti-malaviकोल्हापूर (09 फेब्रुवारी) : लाच प्रकरणी अटक आणि जामिनीनंतरही महापौरपद सोडण्यास नकार देण्यार्‍या तृप्ती माळवींना आज (सोमवारी) राजीनामा द्यावा लागण्याची शक्यता आहे.  पालिकेत महासभा होणार असून या सभेत राष्ट्रवादीचे नगरसेवकच माळवी यांच्या राजीनाम्याचा ठराव मांडण्याची शक्यता आहे.

शिवाजी पेठेत जमीन हस्तांतरीत प्रकरणी संतोष पाटील यांच्याकडून तृप्ती माळवी यांच्या स्विय सहाय्यक अश्वीन गडकरी यांनी 40 हजारांची लाच मागितली होती. पाटील यांनी 16 हजार रुपये गडकरी यांना दिले त्यावेळी लाचलुचपत विभागाच्या अधिकार्‍यांनी माळवी आणि गडकरींना रंगेहाथ पकडलं होतं. या प्रकरणी तृप्ती माळवी यांना 30 जानेवारीला ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना 5 फेब्रुवारीला अटक करुन त्याच दिवशी त्यांना कोल्हापूरच्या सत्र न्यायालयानं जामीनही मंजूर केला होता. पण आज कोल्हापूर महापालिकेची विशेष महासभा होणार आहे. या सभेमध्ये महापौर तृप्ती माळवी या आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजचा दिवस कोल्हापूर जिल्ह्यासाठी महत्वाचा असणार आहे. पक्षाची बदनामी होत असल्याचं कारण देत खरं तर 31 जानेवारीलाच त्यांच्याकडून राजीनामा लिहून घेतलाय. त्यामुळे आज माळवी स्वतःहून राजीनामा देणार की, पक्षाचे नगरसेवक त्यांच्या राजीनाम्याचा ठराव मांडणार याकडं संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 9, 2015 01:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading