शरद पवारांच्या हस्ते बेळगाव नाट्यसंमेलनाचं उद्घाटन

शरद पवारांच्या हस्ते बेळगाव नाट्यसंमेलनाचं उद्घाटन

  • Share this:

natak sammelan

07 फेब्रुवारी : 95व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचा उद्घाटन सोहळा आज (शनिवारी) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते दणक्यात पार पडला. यावेळी राजकीय तसेच, कला क्षेत्रातील अनेक मान्यवर सोहळ्याला उपस्थित होते. यंदाचं नाट्यसंमेलन बेळगावात असल्यामुळे बेळगावकरांना आज आणि उद्या या नाट्यसंमेलनाची रंगत अनुभवता येणार आहे. पण नाट्यसंमेलनाची 'पहिली घंटा' वादाची ठरली आहे. कर्नाटक पोलिसांचा आदेश झुगारत एकीकरण समितीने नाट्यदिंडीत आणि उद्घाटनास्थळी संयुक्त महाराष्ट्राची घोषणाबाजी केली.

नाट्यसंमेलनाच्या पूर्वसंध्येला कर्नाटक पोलिसांकडून नाट्यसंमेलनासाठी जाचक 21 अटी घालण्यात आल्या. यामध्ये सीमाप्रश्नासंदर्भात कोणताही ठराव मांडता येणार नाही, अशी जाचक अट कर्नाटक पोलिसांनी घातली आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 7, 2015 12:47 PM IST

ताज्या बातम्या