05 फेब्रुवारी : टीम इंडियाच्या वर्ल्ड कप कॅम्पेनची सुरुवात अपेक्षेप्रमाणे चांगली झालीये असं म्हणता येणार नाही. ऑस्ट्रेलिया दौर्यात टीम इंडियाच्या पदरी फक्त आणि फक्त निराशाच पडली आहे. त्यामुळेच कॅप्टन महेंद्र सिंग धोणीने आता वेगळी स्ट्रॅटेजी वापरण्याचा निर्णय घेतला आहे.
कॅप्टन धोणीने सध्या आपलं पूर्ण लक्ष बॉलींगवर केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी धोणी, इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार आणि मोहित शर्मा या टीम इंडियाच्या फास्ट बॉलर्सला घेऊन एका कॅम्पला गेला आहे. या कॅम्पमध्ये फास्ट बॉलर्सने या संपूर्ण दौर्यात प्रचंड मार खाल्ला आहे. त्यामुळे वर्ल्ड कपआधी त्यांचं मनोधैर्य उंचावण्याचा आणि त्यांचा फिटनेस परत मिळवण्याचा धोणीचा हा प्रयत्न असल्याचं बोललं जातं आहे.
नुकतीच पार पडलेल्या ऑस्ट्रेलिया टेस्ट सीरिजमध्ये टीम इंडियाला सपाटून मार खाल्ला होता, तर ट्राय सीरिजमध्येही वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडने धुव्वा उडवला होता. त्याच पार्श्वभूमीवर धोणी आता कंबर कसून कामाला लागला आहे.
धोणीचा कॅम्प
- ऍडलेडपासून 200 कि.मी. अंतरावर
- इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार आणि मोहित शर्माचा सहभाग
- फिशिंग, बोटिंग, रॉक क्लाईम्बिंगसारख्या प्रकारांचा वापर
- फास्ट बॉलर्सचा फिटनेस उंचावण्यासाठी धोणीचा अनोखा कॅम्प
- अपयशी दौर्यानंतर मनोधैर्य उंचावण्यासाठी प्रयत्न
- गुरुवारी कॅम्प संपवून पुन्हा टीम प्रॅक्टिसमध्ये होणार सहभागी
Follow @ibnlokmattv |