अजित पवार, तटकरे अडचणीत, 12 सिंचन प्रकल्पांची चौकशी होणार

अजित पवार, तटकरे अडचणीत, 12 सिंचन प्रकल्पांची चौकशी होणार

  • Share this:

Irrigation scam

5 फेब्रुवारी : 100 दिवस पूर्ण व्हायच्या आतच फडणवीस सरकारने अजित दादा आणि सुनील तटकरेंना दणका दिला आहे. आघाडी सरकारच्या काळात दिलेल्या सिंचन कामांच्या 128 निविदा रद्द करण्यात आल्या आहेत. या निविदांची एकूण किंमत 624 कोटी रुपये इतकी आहे. याच बरोबर कोकणातल्या 12 सिंचन प्रकल्पांच्या चौकशीचे आदेशही जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी अँटी करप्शन विभागाला दिले आहेत.

राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार सत्तेवर असताना राज्यातील विविध सिंचन प्रकल्पांत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राजकीय पक्षांसह अन्य संघटनांकडून करण्यात आला. या संदर्भात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर अजित पवारांनी राजीनामा दिला होता. सिंचन कामांच्या चौकशीसाठी माधवराव चितळे समितीही स्थापन करण्यात आली होती.

दरम्यान, हे प्रकरण हॉयकोर्टापर्यंत पोचले आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचा प्रचारही याच मुद्यांवर रंगला होता. प्रचारादरम्यान, भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी सत्तेवर आल्यास सिंचन गैरव्यवहाराची चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते. अजित पवारांना अटक करू, अशी घोषणाही विनोद तावडेंनी केली होते. गेल्या डिसेंबर महिन्यात नागपूर इथल्या हिवाळी अधिवेशनात सिंचनाच्या काही प्रकरणांची अँटीकरप्शन विभागाकडून चौकशी करण्याचा निर्णय याआधीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला होता.

Follow @ibnlokmattv

First published: February 5, 2015, 9:04 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading