तृप्ती माळवींचा अटकपूर्व जामीन फेटाळला, अटकेची शक्यता

  • Share this:

Trupti-Malviकोल्हापूर (04 फेब्रुवारी) : महापौर तृप्ती माळवी यांना लाच प्रकरणी न्यायालयानं दणका दिलाय. अटकपूर्वी जामिनासाठी माळवी यांनी केलेला जामीन अर्ज कोल्हापूरच्या सत्र न्यायालयानं फेटाळून लावलाय. त्यामुळे माळवी यांच्यावर आता अटकेची कारवाई होण्याची शक्यता आहे.

30 जानेवारी रोजी माळवी आणि त्यांच्या पीएला 16 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलं होतं. पण त्याच दिवशीच्या चौकशीनंतर माळवी यांना रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं.

माळवी यांना डिस्चार्ज मिळाल्यावरच त्यांना अटक होणार असं लाचलुचपत प्रतिबंध खात्याने स्पष्ट केलं. माळवी यांनी अटक टाळण्यासाठी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. पण न्यायालयानं तो फेटाळल्यानं आता त्यांना अटक कधी होणार याचीच चर्चा कोल्हापूरमध्ये रंगलीये.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 4, 2015 08:33 PM IST

ताज्या बातम्या