आयसिसकडून जॉर्डनच्या पायलटची निर्घृण हत्या

आयसिसकडून जॉर्डनच्या पायलटची निर्घृण हत्या

  • Share this:

2_1423005210

04 फेब्रुवारी : आयसिस या अतिरेकी संघटनेने आणखी एक धक्कादायक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. या व्हिडिओमध्ये जॉर्डनच्या एका पायलटला जिंवत जाळल्याचे दाखवले गेले आहे.

मोएज अल कसासबेह या जॉर्डनच्या पायलटला एका पिंजर्‍यात कोंडून या पायलटला जिवंत जाळल्याचा हा व्हिडिओ आहे. ट्विटरच्या माध्यमातून हा व्हिडिओ सध्या सगळीकडे फिरत आहे.

जॉर्डनच्या पायलटचे विमान अमेरिकेच्या नेतृत्वाखालील लष्करी मोहिमेदरम्यान सीरियातील रक्का येथे दुर्घटनाग्रस्त झाले होते. तेव्हापासून आयसिसने त्याला ओलीस ठेवले होते. मोएजच्या सुटकेसाठी आयसिसने जॉर्डनच्या ताब्यात असलेल्या त्यांच्या दहशतवाद्याच्या सुटकेची मागणी केली होती.

दरम्यान, या घटनेचा जॉर्डनमध्ये तीव्र निषेध होत आहे. जॉर्डन सरकारने आत्मघातकी हल्ल्याचा कट रचणारी इराकी महिला साजिदा अल रिझवी आणि तिच्या साथीदाराला अटक केली होती. या दोघांनाही आज (बुधवार) फाशीची शिक्षा देण्यात आल्याचं, जॉर्डनच्या सरकारी अधिकार्‍यांनी सांगितले.

मोएजच्या हत्येनंतर जॉर्डन सरकारने कडक पाऊल उचलून दोन जिहादींना फासावर लटकविले आहे. या आधी दोन दिवसांपूर्वीचं आयसिसने जपानी पत्रकार केंजी गोटो याच्या हत्येच्या व्हिडिओ प्रसारित केला होता.

 

Follow @ibnlokmattv

First published: February 4, 2015, 12:27 PM IST

ताज्या बातम्या