'एआयबी'चा 'तो' शो वादात, तीन कलाकारांविरोधात तक्रार

'एआयबी'चा 'तो' शो वादात, तीन कलाकारांविरोधात तक्रार

  • Share this:

AIB roster

मुंबई (03 फेब्रुवारी) :  विनोदाच्या नावाखाली एकमेकांवर अत्यंत अश्लील शब्दांत केलेली टीका बॉलीवूडच्या काही सेलिब्रिटीजना भोवण्याची शक्यता आहे. एआयबी या ट्यूब चॅनलवर नुकताच रिलीज झालेला 'एआयबी नॉकआऊट' हा शो त्यातल्या खालच्या दर्जाचे आणि अश्लील विनोदांमुळे वादात सापडला आहे. याच कार्यक्रमात

निर्माता- दिग्दर्शक करण जोहर, अभिनेता अर्जुन कपूर, रणवीर सिंग हे सहभागी झाले होते.

एआयबीतर्फे वरळीच्या सरदार वल्लभभाई पटेल ऑडिटोरियममध्ये 20 डिसेंबरला 'एआयबी नॉकआऊट - रोस्ट ऑफ अर्जुन कपूर ऍण्ड रणवीर सिंग' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या शोचं एका वेळचं तिकीट तब्बल 4 हजार रुपये होतं. त्यात करण जोहर, अर्जुन-रणवीर यांच्याबरोबरच दीपिका पदुकोण, सोनाक्षी सिन्हा, आलिया भट हे सेलिब्रिटी सहभागी झाले होते. या शोमध्ये अश्लील शब्दांचा भडीमार करण्यात आला.

अर्जुन-रणवीर यांचा अपमान करत त्यांच्यावर शिवराळ भाषेत शेरेबाजी करण्यात आली होती. या कलाकारंनीही या कार्यक्रमाच्या आयोजकांवर जशास तसे वार केले. अत्यंत खालच्या दर्जाच्या विनोदाचं दर्शन घडवणारा हा कार्यक्रम 29 जानेवारीला यूट्युबवर अपलोड करण्यात आला. तीन भागांमध्ये असलेला हा व्हिडीयो आतापर्यंत लाखो नेटिझन्सनी पाहिलाय. कॉलेज कट्‌ट्यापासून ते चहाच्या टपरीपर्यंत या व्हिडीओबाबत चर्चा रंगू लागल्या. त्याचबरोबर अश्लील भाष्य केल्याप्रकरणी तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. संबंधितांवर कारवाई व्हावी अशी मागणीही होत आहे. या प्रकरणी पोलिसांमध्ये तक्रारी करण्यात आल्यात आणि राज्य सरकारनेही कार्यक्रमाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

'एआयबी' या शोमध्ये अतिशय अश्लिल भाषा वापरल्यामुळे करण जोहर, अर्जुन कपूर आणि रणवीर सिंह यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुंबईतील ब्राम्हण एकता सेवा संस्थेचे अध्यक्ष अखिलेश तिवारी यांनी याबाबतची तक्रार साकीनाका पोलिसांत दिली आहे. पोलिसांनीही याबाबत तातडीने पावलं उचलायला सुरुवात केली आहे

'एआयबी'ने याआधी आलिया भटवर काढलेला व्हिडीओही असाचं गाजला होता. दरम्यान, आपल्याविरोधात चौकशी करण्यात येणार असल्याचे आम्हाला सूत्रांकडून समजले आहे. मात्र, सध्या तरी आमच्याकडे सांगण्यासारखे काही नाही. जेव्हा विचारणा होईल तेव्हा आम्ही त्या?विषयी सर्वांनाच सांगू, असे एआयबीनं ट्विट करून स्पष्ट केलं आहे.

'एआयबी' या शोला योग्य प्रमाणपत्र मिळालं की नाही याबाबत फक्त चौकशी होऊ शकते, मात्र या शोला नियमानुसार परवानगी मिळाली असेल, तर हा शो मी रोखू शकत नाही, असं मत राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी ट्विटरवरून व्यक्त केलं आहे.

Follow @ibnlokmattv

First published: February 3, 2015, 11:26 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading