भुजबळांना सुप्रीम कोर्टाचा दणका, भ्रष्टाचाराप्रकरणी 'एसआयटी' चौकशी होणार

  • Share this:

Chagan Bhujbal

02 फेब्रुवारी :  सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्टाचारप्रकरणी सुप्रीम कोर्टाने आज (सोमवारी) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळांना दणका दिला आहे. भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) नेमण्याचा मुंबई हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टानेही कायम ठेवल्याने भुजबळ यांची चौकशी अटळ आहे.

आपच्या नेत्या अंजली दमानिया यांनी सार्वजनिक बांधकाम विभागातील 11 भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली होती. मुंबई हायकोर्टाने याप्रकरणी एसआयटी नेमून याप्रकरणाची चौकशी करावी असे आदेश राज्य सरकारला दिले होते. या निर्णयाविरोधात भुजबळ यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. सोमवारी सुप्रीम कोर्टात भुजबळ यांच्या सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाने मुंबई हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवत भुजबळांना दणका दिला. याप्रकरणी भुजबळ यांनी पुन्हा मुंबई हायकोर्टाकडेच अपील करावे असं स्पष्ट करत सुप्रीम कोर्टाने भुजबळांची याचिकाही फेटाळली आहे.

Follow @ibnlokmattv

First published: February 2, 2015, 2:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading