कोल्हापूरच्या महापौर तृप्ती माळवींनी दिला पदाचा राजीनामा

कोल्हापूरच्या महापौर तृप्ती माळवींनी दिला पदाचा राजीनामा

  • Share this:

Trupti-Malvi01 फेब्रुवारी : लाचखोर महापौर तृप्ती माळवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आर. के. पवार यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला आहे, पण त्यांना अजूनही अटक करण्यात आलेली नाही.

लाचलुचपत विभाने शुक्रवारी महापौर तृप्ती माळवी यांना 40 हजारांची लाच घेताणा रंगेहाथ पकडले. माळवी यांनी 40 हजाराची लाच मागितल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मिळाली होती. त्यातील काही रक्कम घेताना तृप्ती माळवी यांना एसीबीने रंगेहाथ पकडलं.

तृप्ती माळवी यांची अटक टाळण्यासाठी धडपड सुरू आहे. प्रकृती बिघडल्याचं कारण देत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच माळवी यांना अटक करू असं पोलिसांनी सांगितलं. अजूनही त्या रुग्णालयातच असून काल रात्री उशीरा पक्षातल्या काही पदाधिकार्‍यांनी माळवी यांची भेट घेऊन पक्षाची बदनामी टाळण्यासाठी राजीनामा देण्यास सांगितल्याचं समजतंय. त्यानुसार माळवी यांनी राजीनामा दिला आहे.

काय आहे प्रकरण?

शिवाजी पेठेतील संतोष पाटील यांच्या घरासमोरची जमीन महापालिकेने ताब्यात घेतली होती. ती जमीन परत मिळवण्यासाठी पाटील यांचे महापालिकेत खेटे सुरू होते. ही जमीन पाटील यांना परत करण्याचा ठराव महापालिकेच्या स्थायी सभेत झाला. मात्र या ठरावावर महापौरांची अंतिम स्वाक्षरी आवश्यक होती. या अंतिम स्वाक्षरीसाठी महापौर तृप्ती माळवी यांनी त्यांचे पीए अश्विन गडकरी यांच्यामार्फत संतोष पाटील यांच्याकडे 40 हजार रुपयांची लाच मागितली.

40 हजार रुपयांना ठरलेला हा व्यवहार, 16 हजारांत सेटल करण्यात आला. 16 हजार रुपये घेऊन पाटील हे महापालिका आवारात आले. त्यांनी या परिसरातच गडकरींकडे 16 हजार रुपये दिले. मात्र त्यांनी महापौरांना भेटण्याची विनंती केली. पाटील यांच्या विनंतीनंतर गडकरींनी त्यांची महापौर तृप्ती माळवी यांची भेट घालून दिली. महापौर चेंबर्समध्ये माळवी यांनी तुमचं काम होऊन जाईल, असं सांगितलं. त्याआधारेच त्यांना ताब्यात घेण्यात आलं.

दरम्यान महापौरांचे पीए अश्विन गडकरी यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. तृप्ती माळवी यांच्या सांगण्यावरूनच लाच मागितल्याची कबुली त्यांनी एसीबीकडे दिली आहे.

Follow @ibnlokmattv

First published: February 1, 2015, 12:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading