राणेंचे कट्टर समर्थक संजय पडते शिवसेनेत

राणेंचे कट्टर समर्थक संजय पडते शिवसेनेत

  • Share this:

rane3331 जानेवारी : कोकणात काँग्रेसचे नेते नारायण राणे यांच्या गडाला आज पुन्हा सुरुंग लागलाय. राणेंचे कट्टर समर्थक संजय पडते शिवसेनेच्या तंबूत दाखल झाले आहे. पडते यांच्यासोबत त्यांच्या पत्नी आणि कुडाळच्या सरपंच स्नेहल पडतेही शिवसेनेत प्रवेश केला.

पडते यांनी आज (शनिवारी) 'मातोश्री'वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव यांनी पडते यांना शिवबंधनाचा धागा बांधून सेनेत प्रवेश दिला.

काँग्रेसमधे घुसमट होत असल्यामुळे आणि आपल्याला त्रास देण्यात येत असल्यानं शिवसेनेत प्रवेश करत असल्याचं संजय पडते यानी सांगितलंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 31, 2015 01:55 PM IST

ताज्या बातम्या